Home » सलमान खानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’चा धमाकेदार ट्रेलर झाला प्रदर्शित

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’चा धमाकेदार ट्रेलर झाला प्रदर्शित

Kisika Bhai Kisika Jaan

सलमान खानने (Salman Khan) आपला आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’चा (Kisika Bhai Kisika Jaan) धमाकेदार ट्रेलर (Trailer) प्रदर्शित केला आहे. सिनेप्रेमी या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, जानेवारीमध्ये या चित्रपटाचा पहिला टीझर दर्शकांच्या भेटीला आला आणि तेव्हापासूनच, चाहत्यांमध्ये या फॅमिली एंटरटेनर चित्रपटाच्या थिएट्रिकल ट्रेलरबद्दल उत्सुकता वाढू लागली. अशातच, सिनेमाचा ट्रेलर अखेरीस रिलीज झाला असून काही मिनिटांतच हा ट्रेलर सर्वत्र ट्रेंड करत आहे.

ट्रेलरची सुरुवात पूजा हेगडे आणि सलमान खान यांच्या उत्तम केमिस्ट्रीने होते. तसेच, तीन मिनिटे आणि काही सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये कमर्शियल हिंदी चित्रपटाकडून अपेक्षित असलेले सर्व घटक आहेत. अशातच, ‘किसी का भाई किसी की जान’च्या ट्रेलरमध्ये फॅमिली इमोशन्स, कॉमेडी, रोमांस, ड्रामा, संगीत आणि अर्थातच अ‍ॅक्शनची झलक पाहायला मिळते.

नक्की वाचा: जेष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि लेखक आणि IAS ऑफिसर विश्वास पाटील घेणार अप्पीचा interview

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy