२०२३ या वर्षाचा शेवट देखील दणक्यात करण्यासाठी शाहरुख खान सज्ज झाला आहे. २१ डिसेंबरला त्याचा बहुप्रतिक्षित ‘डंकी’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. सध्या या सिनेमाची कमालीची चर्चा आहे. सिनेमाचा टिझर आल्यानंतर तर या सिनेमाबद्दल असलेली प्रेक्षकांची उत्सुकता खूपच वाढली आहे. आता या सिनेमातील तिसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. याआधी आलेल्या पहिल्या गाण्याला प्रेक्षकांनी कमालीचा प्रतिसाद दिला. आता दुसरे गाणे देखील गाजणार हे गाणे पाहूनच आपल्या लक्षात येईल.
‘डंकी-ड्राप 3’ ‘निकले थे कभी हम घर से’ प्रदर्शित करण्यात आले आहे. याआधी ‘डंकी-ड्राप 2’ मधील पहिले गाणे ‘लुट पुट गया’ प्रदर्शित झाले होते. ज्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. डंकी सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान ही जोडी एकत्र काम करताना दिसणार आहे. शिवाय याच सिनेमात अजून एक नवीन जोडी एकत्र पहिल्यांदाच काम करते आणि ती जोडी म्हणजे शाहरुख आणि तापसी.
‘निकले थे कभी हम घर से’ हे डंकी ड्रॉप ३ मधील दुसरे गाणे अतिशय भावुक करणारे गाणे आहे. या गाण्यातून आपल्याला मातृभूमीबद्दल असलेले तडफड दिसणार आहे. या गाण्याला सोनू निगमने त्याच्या शांत आणि मधुर आवाजात गायले असून, प्रीतमने गाण्याला संगीत दिले आहे. तर गाण्याचे शब्द जेष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिले आहे. या गाण्याला राजकुमार राव यांनी सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. गाणे शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “घर हे असे स्थान किंवा जागा आहे जिथे भावना राहतात. आणि ‘निकले थे कभी हम घर से’ हे गाणे एक भावनात्मक प्रवास आहे. आशा करतो की, हे गाणे तुमच्या मनात देखील जागा बनवेल. हे रिलीज झालेले गाणे एका आणि प्रतिक्रिया द्या.”
शाहरुख खानने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “आज असेच मनात आले की, हे गाणे मी तुमच्यासोबत शेअर करू, तर मी हे गाणे तुमच्यासोबत शेअर करत आहे. राजू आणि सोनू नावानेच हुशार आहेत. आपल्याच असलेल्या या दोघांनी आपल्याचसाठी हे गाणे तयार केले आहे. हे गाणे आपल्या घराचे, आपल्या मातीतले, आपल्या गावाचे आणि आपल्या देशात मिळणाऱ्या एका अव्यक्त अशा आनंदाचे, शांततेचे आहे. आपण कधी ना कधी आपल्या गावातून, घरातून, देशातून बाहेर जातो, मात्र आपले हृदय कायम तिथेच असते.”
या सिनेमात शाहरुखसोबत बोमन इराणी, विकी कौशल देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.