Home » ऐकता क्षणी प्रेमात पाडणारं ‘अंतरपाट’ चे शीर्षकगीत प्रदर्शित

ऐकता क्षणी प्रेमात पाडणारं ‘अंतरपाट’ चे शीर्षकगीत प्रदर्शित

मालिकांचे शीर्षक गीत हे नेहमीच आकर्षणाची गोष्ट असते. मालिकांइतकेच त्यांचे शीर्षक गीत देखील तुफान गाजते. मलिकच्या शीर्षक गीताची प्रेक्षकांमध्ये असणारी क्रेझ कमाल आहे. मालिका संपल्यानंतरही ही गाणी प्रेक्षकांच्या ओठांवर सतत येत असतात. शीर्षक गीत गाजले तर मालिका देखील गाजणार असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

लवकरच कलर्स मराठीवर ‘अंतरपाट’ ही एक नवीन कोरी मालिका सुरु होत आहे. या मालिकेचे प्रोमो प्रदर्शित झाले असून, ते चांगलेच लोकप्रिय होत आहे. सोशल मीडियावर देखील हे प्रोमो व्हायरल झाले आहेत. कलर्स मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांना उत्तम गुणवत्ता असलेल्या मालिका भेट देत असून नेहमीच रसिकांचे मनोरंजन करत आहे. या वेळी प्रेक्षकांना नवनवीन मालिका पाहायला मिळत आहेत. कलर्स मराठीवर ‘अंतरपाट’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकतेच या मालिकेचे शीर्षकगीत कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम ,युट्यूब आणि फेसबुक पेजवर प्रदर्शित झाले आहे. हे गीत ऐकता क्षणी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण करणारे आहे.

“दोन मनाच्या दोन दिशा अन एक हळवी वाट..”, असे या गाण्याचे बोल आहेत. या शीर्षकगीताला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून रसिक भरभरून प्रेम करत आहेत. यात गौतमीच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगत आहे. तर क्षितीजच्या मनात घालमेल सुरु असल्याचे दिसत आहे. काय असेल क्षितीजच्या मनात? का आणि कशासाठी असे टोकाचे पाऊल उचलले असेल? असे अनेक प्रश्न हे शीर्षकगीत पाहून मनात येत असतील तर याची उत्तरे आपल्याला लवकरच मिळणार आहेत.

प्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि सावनी रवींद्र यांच्या मधुर आवाजाने हे गीत अधिकच श्रवणीय बनले आहे. निषाद गोलंबरे यांनी या गीताला सुरेल संगीत दिले असून, वैभव जोशी यांच्या अत्यंत भावपूर्ण शब्दांनी हे गाणे सजले आहे. या गीताने नक्कीच प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले असून प्रत्येकाच्या मनाला भिडणारे आणि हृदयाला स्पर्शून जाणारे हे गीत आहे. ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात ‘अंतरपाट’ मालिकेबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

https://www.facebook.com/watch/?mibextid=KsPBc6&v=974107604364661&rdid=dDmkf6sToyUOrvPE

‘अंतरपाट’ मालिकेच्या शीर्षकगीताने प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या असून रसिक या मालिकेची आतुरतेने वाट पाहात आहेत. शीर्षकगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांना मालिकेच्या कथानकाची आणि भावनिक प्रवासाची थोडी फार झलक पाहायला मिळत आहे.

‘अंतरपाट’ मालिकेचे शीर्षकगीत तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आणि यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता. ‘अंतरपाट’ ही मालिका १० जूनपासून दररोज संध्याकळी ७: ३० वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर तुम्ही पाहू शकता.

Spread the love

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy