Home » सईच्या घरी आली नवी पाहुणी! नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

सईच्या घरी आली नवी पाहुणी! नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Sai Tamhankar

Sai Tamhankar New Car: मराठीसह बॉलीवूड सिनेविश्वात अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचा दबदबा निर्माण केला आहे. स्वप्न पाहिली आणि त्यासाठी अपार मेहनत केली की, आपली स्वप्न सत्यात उतरतात असंच काहीसं सईबरोबर झालं आहे. २०२४ हे वर्ष तिच्यासाठी सर्वार्थाने खास ठरत आहे. सईने मर्सिडीज बेंझ ही नवीकोरी गाडी गुढी पाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली.

गुढीपाडव्याच्या शुभदिवशी सईने आलिशान गाडी खरेदी केली आहे. सईने मर्सिडीज बेंझ ही नवीकोरी गाडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली आहे. यावेळी सईचे कुटुंबीय आणि आई उपस्थित होती. लेकीचा आनंद पाहून तिची आई देखील भारावून गेल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

सईने हा व्हिडिओ शेअर करत लिहिते आहे, ‘तुम्ही काय करू शकता किंवा काय करू शकत नाही हे इतर कोणालाही तुम्हाला सांगू देऊ नका. स्वप्न पाहा, पूर्ण करा आणि जगा! नवीन वर्षाची सुरुवात करत असताना चला नवे ध्येय पुढे ठेवूया आणि ते एकत्रितपणे पूर्ण करूया’.

आता येत्या काळात सई ‘डब्बा कार्टल’, ‘अग्नी’, ‘ग्राउंड झिरो’ अशा वैविध्यपूर्ण प्रोजेक्टमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. सध्या नेटकरी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

======

हे देखील वाचा: सुबोध भावे यांनी केले संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चे पहिले पोस्टर आऊट

======

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy