Home » पालकांनी आपल्या मुलांसोबत आवर्जून अनुभवावी अशी ‘सुंदर ती दुसरी दुनिया’

पालकांनी आपल्या मुलांसोबत आवर्जून अनुभवावी अशी ‘सुंदर ती दुसरी दुनिया’

आजच्या २१ व्या शतकातील मुलं आणि त्यांचे बालपण खूपच वेगळे आहे. साधारण ९० च्या दशकातील पिढी कदाचित शेवटची पिढी असावी ज्यांनी खऱ्या अर्थाने बालपण जगले. मात्र त्यानंतर आलेली पिढी ही अगदी काही महिन्यातच मोबाईलच्या, टीव्हीच्या अधीन होते आणि त्यातच त्यांचे बालपण व्यतीत होते. मुलांना बाहेरच्या जगाची ओळखच होत नाही. यामुळेच ही मुलं नेहमीच स्वतःमध्ये गुंतलेली असतात. त्यांना समाजात, लोकांमध्ये मिक्स व्हावे असे वाटत नाही.

सोशल मीडिया, इंटरनेट, रिल्सच्या युगात लहान मुले त्यांचे बालपण विसरत आहेत. मे महिन्यात मित्रमैत्रिणींसोबत दिवसभर हुंडाळणे, विटीदांडू, साखळीसाखळी असे अनेक खेळ तर हल्ली कालबाह्य झाले आहेत. हल्लीच्या लहान मुलांना या खेळांची नावही माहित नाहीत. स्पर्धेच्या नावाखाली मुलांची केवळ धावपळच सुरु आहे.

या सगळ्यात मुलांची हिरावलेली निरागसता परत मिळवून बालपणात घेऊन जाणारे ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ हे धमाल नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला आले आहे. वेध थिएटर निर्मित, अपूर्वा प्रॉडक्शन प्रस्तुत या दोन अंकी महाबालनाट्यात ६० बालकलाकार आहेत. डॉ. समीर मोने लिखित या नाटकाची संकल्पना संकेत ओक यांची असून निर्मिती सुमुख वर्तक यांनी केली आहे तर टीम वेधने ‘सुंदर ती दुसरी दुनिया’चे दिग्दर्शन केले आहे.

नाटकाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सुमुख वर्तक म्हणतात, ” लहान मुलांसोबत मोठ्यांना सुद्धा त्यांच्या बालपणात घेऊन जाणारी ही कलाकृती असल्याने प्रत्येक पाल्याने, पालकांनी आणि नाट्यप्रेमींनी आवर्जून पाहावे, असे हे नाटक आहे. नाट्यगृहातून बाहेर पडताना प्रत्येक बालक एक सकारात्मक संदेश घेऊन निघेल. ठाणे, डोंबिवलीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता हा प्रयोग ३ डिसेंबर रोजी बोरिवली येथील प्रबोधनकर ठाकरे नाट्यगृह आणि १७ डिसेंबर रोजी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सकाळी अकरा वाजता होणार आहे. या नाटकात आणखीन एक वेगळा प्रयोग केला आहे, तो म्हणजे प्रत्येक प्रयोगागणिक या बालनाट्यात बालकलाकार वाढणार आहेत. १७ डिसेंबरच्या प्रयोगात १२० बालकलाकार रंगत आणणार आहेत. अनेकांनी या नाटकाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाल्यांपासून पालकांपर्यंत सर्वांनाच खुर्चीला खिळवून ठेवणारे हे नाटक मजा, मस्ती, धमाल करत सगळे एन्जॉय करत आहेत.”

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy