Home » जेष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि लेखक आणि IAS ऑफिसर विश्वास पाटील घेणार अप्पीचा interview

जेष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि लेखक आणि IAS ऑफिसर विश्वास पाटील घेणार अप्पीचा interview

Appi Amchi Collector

झी मराठी (Zee Marathi) ही अशी वाहिनी आहे जी नेहेमीच वेगवेगळे विषय हाताळत आली आहे, असाच वेगळा विषय घेऊन सुरु झालेली मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’. (Appi Amchi Collector) अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे. या संघर्षात तिचे बापू, नवरा अर्जुन, भाऊ दिप्या तिच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले आपण पाहिलं. ही मालिका आता चर्चेचं विषय होतेय आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी ठरत आहे, कारण अप्पीने नुकतीच UPSC ची परीक्षा पहिल्या नंबरने पास केली आहे, आणि आता तिचं कलेक्टर बनण्याचं स्वप्न दृष्टीपथात येणार आहे.

नक्की वाचा:

पण यासाठी तिला अजून एका परीक्षेमधून जावं लागणार आहे ते म्हणजे तिचा interview जो घेणार आहेत, जेष्ठ विशेष सरकारी वकील ‘उज्वल निकम’ आणि लेखक आणि IAS ऑफिसर ‘विश्वास पाटील’ या मालिकेच्या निमित्ताने हे दोन ऑफिसर्स टेलीव्हिजनवर प्रथमच मालिकेत खरीखुरी भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे कलेक्टर बनण्याचा अखेरचा कठीण टप्पा पार करेल का अप्पी? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यासाठी पाहायला विसरू नका ‘अप्पी आमची कलेक्टर’ मंगळवार ११ एप्रिल संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy