Home » अभिनेता हार्दिक जोशीचे झी मराठीवर पुनरागमन दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत, शो प्रोमो व्हायरल

अभिनेता हार्दिक जोशीचे झी मराठीवर पुनरागमन दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत, शो प्रोमो व्हायरल

कायमच मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी वाहिनी म्हणून झी मराठीने आपला नावलौकिक तयार केला आहे. या वाहिनीने त्यांच्या विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. नेहमीच सगळ्यांना काहीतरी वेगळेच देण्याचा त्यांचा प्रयत्न सर्वांनीच पाहिला आहे. मालिकांसोबतच हटके रियॅलिटी शो या वाहिनीवर येत असल्यामुळे प्रेक्षकांना देखील ते पाहायला फार आवडतात. अशातच आता याच झी मराठीवर एक नवीन आणि अतिशय हटके असा नवीन भन्नाट रियॅलिटी शो सुरु होत आहे.

‘जाऊ बाई गावात’ असे झी च्या नवीन शोचे नाव आहे. या नावावरूनच हा शो गावाकडचा असणार हे नक्कीच. मागील अनेक दिवसांपासून या शोचे विविध प्रोमो झळकत आहे. सोशल मीडियावर देखील हे प्रोमो कमालीचे व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. या प्रोमोमधून जाणवते की, शहरातील लोकांना त्यांच्या आलिशान जीवनशैलीला सोडून गावाकडच्या सध्या राहणीमानासोबत राहावे लागणार आहे. कदाचित मराठीमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. या प्रोमोमध्ये एक बाब खूपच खास आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. ही बाब म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

सगळ्यांचाच लाडका राणा दा अर्थात हार्दिक जोशी पुन्हा एकदा अनेक महिन्यांनी झी मराठीवर झळकणार आहे. शोचा जो नवीन प्रोमो प्रदर्शित झालाय त्यात आता हार्दिक जोशी म्हणताना दिसतोय करणार ‘तेव्हा कळणार आता मज्जा येणार’ नेमकं काय कळणार आणि काय मज्जा येणार हे प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईल. मात्र त्यासाठी सर्वाना थोडी वाट पाहावी लागणार आहे. झी ने अशी एक अफलातून संकल्पना जिचा प्रेक्षकांनी विचार सुद्धा केला नसेल आता तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या लाडक्या झी मराठीवर.

दरम्यान झी मराठीच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या तुफान गाजलेल्या मालिकेमध्ये राणा दा ही लोकप्रिय भूमिका साकारल्यानंतर पुन्हा एकदा हार्दिक एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येण्यासाठी सज्ज झाले आहे. त्याला या नवीन भूमिकेत बघण्यस्तही प्रेक्षक आणि त्याचे फॅन्स कमालीचे उत्सुक झाला आहेत.

दिवाळीचा खुमासदार फराळाची चव जिभेवर रेंगाळत असतांना, प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करणारा हा कार्यक्रम म्हणजे ‘जाऊ बाई गावात’ आपल्या भेटीस येत आहे लवकरच आपल्या झी मराठीवर.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy