Home » आशावादी, प्रतिभावान अशी ‘झनक’ येते सर्वांच्या भेटीला, स्टार प्लसवरील नवीन मालिकेच्या प्रोमोने वेधले लक्ष

आशावादी, प्रतिभावान अशी ‘झनक’ येते सर्वांच्या भेटीला, स्टार प्लसवरील नवीन मालिकेच्या प्रोमोने वेधले लक्ष

सध्या विविध हिंदी वाहिन्यांवर अनेक हटके विषयांवर बऱ्याच मालिका येऊ घातल्या आहेत. हिंदीमध्ये अनेक वाहिन्या असल्या तरी सर्वात लोकप्रिय वाहिनी आहे, ती स्टार प्लस. या वाहिनीवरील सर्वच मालिका तुफान गाजतातच. सोबतच ही वाहिनी नेहमीच काहीतरी वेगळे विषय घेऊन मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आता मालिकांच्या गर्दीत या स्टार प्लसवर अजून एक अतिशय सुंदर अशी मालिका सुरु होत आहे. ती मालिका म्हणजे ‘झनक’.

एका अतिशय आशावादी, स्वप्न पाहणारी आणि प्रतिभावान तरुण मुलीची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री कृशाल आहूजा दिसणार असून तिच्यासोबत अभिनेता अनिरुद्ध दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा एक भावनिक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, सर्वच सुख सुविधांपासून वंचित असलेली एक मुलगी जीवन जगण्यासाठी संघर्ष करताना दाखवला आहे.

मात्र अचानक एक मोठे संकट त्यांच्या परिववार कोसळते आणि त्यांचे संपूर्ण आयुष्याचं बदलून जाते. अशातच शोमध्ये अनिरुद्धची एन्ट्री होते, जो झनकची मदत करतो. मात्र झनक आणि अनिरुद्ध भेटत नाही. एकदा नशीब त्यांना एकमेकांच्या समोर आणून उभे करते. मात्र पुढे काय घडते? ती मुलगी स्वतःच्या सामान अधिकार आई हक्कांसाठी कशी लढते? तिचे प्रेम तिला स्वीकारणार का? आदी अनेक प्रश्नांची उत्तरं मालिका पाहिल्यानंतर मिळेल. या मालिकेची कथा खूपच भावनिक आणि हृदयाला स्पर्श करून जाणारी आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy