Home » Gadar 2 Movie Review: २२ वर्षांनंतरही जैसे थे.!  

Gadar 2 Movie Review: २२ वर्षांनंतरही जैसे थे.!  

Gadar 2 Movie Review In Marathi

‘गदर २’ चित्रपटातील एका दृश्यात, पाकिस्तानी जनरल.. पकडलेल्या तारा सिंगचा मुलालाला आव्हान देतो की यावेळी तो काय उखडतो ते पाहू. त्यानंतर मागच्या ‘गदर’मध्ये हातपंप उखडून टाकणारा तारा सिंग (सनी देओल) आता काय उखडतो? हे पाहण्यासाठी तुम्ही ही सिनेमा पाहायला जाल… जवळपास २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ‘गदर २‘ या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमध्ये इतकी जबरदस्त ‘क्रेझ’ आहे की, तीन लाखांहून अधिक आगाऊ तिकिटे विकली गेली होती. अलीकडेच ‘फॉरके’ आवृत्तीमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेला ‘गदर: एक प्रेम कथा’ चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने तेव्हा प्रेक्षकांनी सिनेमागृह हजेरी लावली होती. ते चित्र आताही सिनेमागृहात कायम आहे. परंतु, ‘गदर २’ लक्षवेधी बनला असला तरी तो तितकासा प्रभावी आणि अवाक करणारा मुळीच नाही. २२ वर्षांनंतरही सिनेमातील परिस्थिती आणि कथनाकचा सूर जैसे थे..च आहे. त्यामुळे अनेक सिनेप्रेमींची निराशा होऊ शकते. बाकी, ज्यांना केवळ ‘आरडा-ओरड’, भडक काही पाहायचं असेल त्यांच्यासाठी सिनेमा नक्कीच रंगतदार बनला आहे.  (Gadar 2 Movie Review)  

१९४७ च्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर ‘गदर’ चित्रपटाची कथा होती. दुसरीकडे, ‘गदर २’ ची कथा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्ध सुरू होण्यापूर्वीची आहे. मागच्या चित्रपटात तारा सिंगने अनेक अडचणींचा सामना करून पत्नी सकिना हिला पाकिस्तानातून परत आणले होते. ‘गदर २’ च्या कथेत, तारा सिंग (सनी देओल) आणि सकीना (अमिषा पटेल) भारतात परतल्यानंतर आनंदी जीवन जगत आहेत. त्याचा मुलगा चरणजीत उर्फ जीते (उत्कर्ष शर्मा) देखील आता मोठा झाला आहे. दुसरीकडे, मेजर जनरल हमीद इक्बाल (मनीष वाधवा) पाकिस्तानमध्ये बदलाच्या आगीत जळत आहे, कारण तारा सिंगने आपल्या रेजिमेंटच्या ४० सैनिकांना यमसदनी धाडलेले असते. दरम्यान हमीदने सकीनाचे वडील अश्रफ अली (अमरीश पुरी) यांना फाशी दिली आहे.

हमीद आता बदल कसा घेतो? या प्रश्नांचं उत्तर देण्यात ‘गदर २’ सिनेमा अधिक गुंतला आहे.एके दिवशी हमीदला अचानक त्याची ही बदल घेण्याची इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळते, जेव्हा ताराचा मुलगा जीत, पाकिस्तानात पोहोचतो. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तारा सिंग पुन्हा एकदा पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतो. तो यात यशस्वी होऊ शकतो का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. आता हे कथानक.. पूर्वीसारखेच जैसे थे आहे! असं म्हणून आपण गपचूप सिनेमा पाहायचा का? हा सर्वस्वी तुम्हा प्रेक्षकांचा निर्णय आहे. पण, हा कथानक काहीही आणि कसंही असो… प्रेक्षक खुर्चीत खिळून राहतो. त्यामागचं कारण म्हणजे.. सिनेमात गच्च ड्रामा भरलेला आहे.  (Gadar 2 Movie Review In Marathi)  

=====

हे देखील वाचा: अक्षय कुमार चा OMG 2 चित्रपट आहे कसा? वाचा रिव्हू

=====    

चित्रपटाची सुरुवात नाना पाटेकर यांच्या आवाजाने होते आणि मागील चित्रपटातील निवडक फुटेज प्रेक्षकांना ‘गदर’ची आठवण करून देतात. चित्रपटाचा पूर्वार्ध थोडा संथ आणि जबरदस्ती आणि नाइलाजाने बघावा लागेल असता आहे. त्याची लांबी थोडी कमी करता आली असती. पण, मध्यंतरापूर्वी कथेत जबरदस्त ट्विस्ट येतो आणि उत्तरार्धात कथा वेगाने पुढे सरकते. मध्यंतरानंतर सनी देओलचा अ‍ॅक्शन अवतार सिनेमाचा पडदा व्यापून टाकण्यात यशस्वी झाला आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा क्लायमॅक्सही दमदार आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा याने ‘गदर २’ मध्ये ‘गदर’च्या आठवणी सुंदरपणे विणल्या आहेत, ज्याच्याशी प्रेक्षक भावूकपणे जोडले जाऊ शकतात. परंतु, ही ट्रिक केवळ जुन्या प्रेक्षकांवरच काम करते. बाकी या सिनेमाच्या नवीन प्रेक्षकांसाठी ही बाब कंटाळवाणी आहे. सिनेमात नेहमीप्रमाणे ‘देशभक्ती’चा उत्तम तडका आहे. आणि हा चित्रपटातील काही अ‍ॅक्शन सीक्वेन्सचे ‘लॉजिक’ तुम्हाला सापडणार नाही. त्यामुळे या दृष्यांकडे तुम्ही कानाडोळा केलेलाच बरा! परंतु, हा सर्व मामला प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्या वाचवायला लावतो.

सनी देओल पुन्हा एकदा तारा सिंगच्या भूमिकेत तल्लीन होऊन पडद्यावर काम करताना दिसतो. तारा सिंग ही भूमिका आता त्यांच्या नसा-नसात भिनली आहे. अमिषा पटेलनेही सकीनाच्या भूमिकेत चांगला अभिनय केला आहे. आणि मनीष वाधवा मेजर जनरल हमीद इक्बालच्या भूमिकेत उठावदार दिसतो. मात्र, उत्कर्ष आणि सिमरन या दोघांनाही अभिनयाच्या दृष्टीने अधिक कामाची गरज आहे. मागील गदरमधील ‘उड जा काले कणवा’ आणि ‘मैं निकला गड्डी लेके’ ही दोन्ही गाणी नव्या चित्रपटातही हिट आहेत. त्याचवेळी, आता चित्रपटाच्या शेवटी आणखी एकदा सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजेच ‘गदर ३’ देखील भविष्यकाळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

दिग्दर्शक: अनिल शर्मा
कलाकार : सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा, मनीष वाधवा
दर्जा : २.५ स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy