Home » Detective Dhananjay मधून बाबुराव अर्नाळकरांचा गाजलेला गुप्तहेर पुन्हा भेटणार; आदिनाथ कोठारेची दमदार भूमिका

Detective Dhananjay मधून बाबुराव अर्नाळकरांचा गाजलेला गुप्तहेर पुन्हा भेटणार; आदिनाथ कोठारेची दमदार भूमिका

मराठी मनोरंजनविश्वात मिस्ट्री आणि थ्रिलरचा रंग आणखी गडद करण्यासाठी ‘झी ५’ घेऊन येत आहे नवी वेब सिरीज ‘डिटेक्टिव्ह धनंजय – रहस्यजाळ’. बाबुराव अर्नाळकर यांच्या गाजलेल्या गुप्तहेर पात्राला नव्या पिढीसाठी नव्या अंदाजात सादर करण्यात आलं असून, या मालिकेत अभिनेता आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली ही मालिका १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झाली आहे.

‘डिटेक्टिव्ह धनंजय – रहस्यजाळ’ ही कथा प्रेक्षकांना शिरगाव या रहस्यमय गावात घेऊन जाते. वरकरणी शांत दिसणारं हे गाव अनेक गुपितांनी भरलेलं आहे आणि प्रत्येक वळणावर एक नवीन रहस्य समोर येतं. गिरीश जयंत जोशी यांनी मालिकेचं लेखन केलं असून, बाबुराव अर्नाळकरांच्या साहित्याचा प्रभाव या कथेत स्पष्टपणे जाणवतो.

या मालिकेची कथा एका बुद्धिमान आणि निरीक्षणशक्ती असलेल्या खासगी गुप्तहेराभोवती फिरते. एका खून प्रकरणाचा तपास करताना त्याला हे जाणवतं की या प्रकरणात दिसतं त्यापेक्षा खूप काही दडलं आहे. फक्त गुन्हेगार शोधणं किंवा त्यामागचं कारण समजून घेणं एवढ्यावर ही कथा थांबत नाही, तर चुकीच्या आरोपाखाली अडकलेल्या व्यक्तीला निर्दोष सिद्ध करण्याचाही प्रयत्न यात पाहायला मिळतो.

‘डिटेक्टिव्ह धनंजय – रहस्यजाळ’चं वेगळेपण म्हणजे ही मालिका फक्त “गुन्हा कोणी केला?” या प्रश्नावर न थांबता “तो का घडला?” या अधिक महत्त्वाच्या प्रश्नाचा शोध घेते. त्यामुळे या कथेला एक वेगळी भावनिक बाजू आहे.

मराठी साहित्यविश्वातील लोकप्रिय गुप्तहेर पात्राला पुन्हा पडद्यावर आणण्याचा हा प्रयत्न मराठी कथाकथनासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. जुन्या फिक्शनचा नॉस्टॅल्जिया आणि आधुनिक कथनशैली यांचा उत्तम मिलाप या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

दमदार कथा, उत्तम कलाकार आणि रहस्याने भरलेलं कथानक यामुळे ‘डिटेक्टिव्ह धनंजय – रहस्यजाळ’ ही मालिका मिस्ट्रीप्रेमींसाठी यंदाच्या वर्षातील एक खास पर्वणी ठरणार आहे.

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy