Home » हा खेळ पत्त्यांचा नाही तर…! हार्दिक जोशीच्या आगामी ‘क्लब ५२’ सिनेमाचा अॅक्शनपॅक्ड टिझर प्रदर्शित

हा खेळ पत्त्यांचा नाही तर…! हार्दिक जोशीच्या आगामी ‘क्लब ५२’ सिनेमाचा अॅक्शनपॅक्ड टिझर प्रदर्शित

हार्दिक जोशी अर्थात आपला सगळ्यांचा लाडका राणादा. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे हार्दिक तुफान लोकप्रिय झाला. त्याची मालिकेतील रांगडी भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. ही मालिका संपल्यानंतरही त्याला राणादा म्हणूनच ओळखले जाते. तुझ्यात जीव रंगला नंतर हार्दिक अनेक चित्रपटांमध्ये दिसला. सध्या तो ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये देखील दिसत आहे. मात्र प्रेक्षकांना हार्दिक चित्रपटात पाहायचे होते. त्यांची हीच इच्छा अखेर हार्दिकने आता पूर्ण केली आहे.

हार्दिक लवकरच एका चित्रपटातून मुख्य भूमिका साकारत समोर येत आहे. ‘क्लब ५२’ असे त्याच्या या आगामी सिनेमाचे नाव आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार टिझर प्रदर्शित करण्यात आला. दमदार स्टारकास्ट असलेल्या “क्लब 52” या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. अमित कोळी दिग्दर्शित हा चित्रपट दमदार अॅक्शनपॅक्ड असून, हार्दिक जोशी यात रफ अँड टफ भूमिकेत पाहायला मिळणार आहे. टिझरमध्ये हार्दिक दमदार ऍक्शन देखील करताना दिसत आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन “क्लब 52” या चित्रपटाला देण्यात आली आहे. टीझरवरून आणि सिनेमाच्या नावावरून हा सिनेमा पत्त्यांच्या डावाशी संबंधित असणार हे नक्की. मात्र सिनेमाची नक्की कथा काय असणार त्यात हार्दिकची भूमिका नक्की कशी असणार याबाबत माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश , टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे. अॅक्शनपॅक्ड टीजरमुळे कथानकाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy