Home » मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्यांचे भाऊदेखील आहेत अभिनेते, या मालिकांमध्ये करतात काम

मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्यांचे भाऊदेखील आहेत अभिनेते, या मालिकांमध्ये करतात काम

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत पुन्हा एकदा लीप दाखवण्यात आला असून या मालिकेचे कथानक १४ वर्षांनी पुढे सरकले आहे. मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली, दीपिका आणि कार्तिकी आता मोठ्या झाल्या आहेत. नुकतीच या मालिकेत दीपिका-कार्तिकीचा खास मित्र आर्यनची एन्ट्री झाली आहे. आर्यनची ही भूमिका अभिनेता मेघन जाधव साकारत आहे. मेघन हा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील जयदीप म्हणजेच अभिनेता मंदार जाधवचा लहान भाऊ आहे. मेघनने, मंदारप्रमाणे याआधी हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तो ‘सास बिना ससुराल’, ‘महाकाली’, ‘राधा-कृष्ण’सारख्या हिंदी मालिकांमध्ये झळकला आहे. मंदार-मेघन प्रमाणेच मराठी मालिकांमध्ये आणखी काही भावांच्या जोड्या काम करत आहेत, ज्यांची नाव ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Google Image

आशुतोष गोखले – ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कार्तिक म्हणजेच अभिनेता आशुतोष गोखले याचा भाऊ देखील मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘अग्गबाई सुनबाई’ या मालिकांमधून घराघरात पोहचलेला अभिनेता अद्वैत दादरकर हा आशुतोषचा भाऊ आहे. अद्वैत आणि आशुतोष यांच्यामध्ये मावस भावाचे नाते आहे.

संकर्षण क-हाडे- माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील यशचा मित्र समीर आठवतो का? ही भूमिका अभिनेता संकर्षण क-हाडे साकारत होता. या भूमिकेतून त्याने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलेसे केले होते. फारच कमी जणांना हे माहित असेल की, संकर्षणचा भाऊदेखील अभिनेता आहे. संकर्षणच्या भावाचे नाव अधोक्षज असून, तो सध्या स्टार प्रवाहवरील ‘पिंकीच विजय असो’ या मालिकेत बंटीची भूमिका साकारताना दिसत आहे. अधोक्षजला याआधी आपण झी मराठीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ हा रिऍलिटी शो आणि ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेमध्ये पाहिले आहे. हे दोघे सख्खे भाऊ आहेत.

Google Image

यतीन कार्येकर
अभिनेते यतीन कार्येकर हे मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव. त्यांनी अनेक हिंदी-मराठी, सिनेमा तसेच मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘राजा शिव छत्रपती’ मालिकेतील त्यांनी साकारलेली औरंगजेबाची भूमिका गाजली होती. यतीन कार्येकर यांचे भाऊ देखील अभिनेते आहे. त्यांचे भाऊ ‘आई कुठे काय करते’ मालिकेत काम करत आहेत. निनाद देशपांडे हे त्यांचे भाऊ. निनाद हे ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनघाच्या वडिलांची म्हणजेच प्रदीप दादांची भूमिका भूमिका साकारत आहेत. अभिनेते यतीन कार्येकर आणि निनाद देशपांडे हे दोघे सख्खे मावसभाऊ आहेत, हे खूप कमी जणांना माहीत आहे. निनाद हे ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचा मुलगा आहेत तर सुलभा देशपांडे यांच्या थोरल्या भगिनी ज्योत्स्ना कार्येकर यांचा अभिनेते यतीन कार्येकर हा मुलगा आहे.

तर मग या भावंडांच्या जोड्यांपैकी तुमचा आवडता अभिनेता कोणता हे कमेंटमध्ये सांगा. आणि आमचा हा लेख आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy