Home » ‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये अपूर्वाला, नेत्रा-अमेयच्या ‘त्या’ रात्रीचे सत्य समजू शकेल का ?

‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये अपूर्वाला, नेत्रा-अमेयच्या ‘त्या’ रात्रीचे सत्य समजू शकेल का ?

‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) या मालिकेत आता नेत्राने सर्व मर्यादा या पार केल्या आहेत. ती खूपच खालच्या स्तरावर उतरली आहे. तिने अमेयला सरबतमधून बेशुद्ध होण्याचे औषध दिले. त्यानंतर त्या रात्री अमेय आणि तिचे इंटिमेट फोटो काढून अपूर्वाला पाठवले. आणि परिक्षा झाल्यावर तिला भेटायला बोलावले आहे.

नक्की वाचा: ‘रंग माझा वेगळा’चे एक हजार एपिसोड पूर्ण, आयेशाच्या परत येण्याने दीपावर नवे संकट

अमेय नेत्राच्या जाळ्यात पूर्ण अडकला आहे. नेत्रा हे सर्व शशांकला मिळवण्यासाठी करत होती पण आता ती कानिटकरांना धडा शिकवण्यासाठी हे सर्व करत आहे. कानिटकर कुटूंबाने तिचा वारंवार जो अपमान केला. त्याची अद्दल तिला घडवायची आहे. यासाठी अमेय हा तिचा मोहरा आहे. अमेय आणि नेत्रा यांच्या इंटिमेट फोटोंमुळे अमेय त्याची बायको आणि बाळापासूनच नाही तर संपूर्ण कानिटकर कुटूंबापासून कायमचा दुरावू शकतो.

”माझ्या प्रत्येक अपमानाचा मी बदला घेणार आहे. या समाजात कानिटकर कुटूंबाला मी ताठ मानेने जगू देणार नाही”, असे सांगत नेत्राने अप्पूला चॅलेंज केले आहे. त्यानंतर अप्पूला राग अनावर होतो. ”तुला हे घर तोडायचे आहे ना खूप प्रयत्न कर, पण मी या घरात असेपर्यंत मी हे घर तूला तोडू देणार नाही. तू चुकीच्या पद्धीतेन वागते त्यामुळे तूला कानिटकरांकडून मिळणारी वागणूक योग्य आहे. तुझ्यामध्ये आणि कानिटकरांमध्ये कायम मी उभी असेन.” असे अप्पू नेत्राला स्पष्ट सुनावते. आता नेत्रा नक्कीच अमेय आणि तिचे त्या रात्रीचे फोटो सर्वासमोर आणून कानिटकर कुटूंबाची बदनामी करण्याच प्रयत्न करेल. याला अप्पू आणि कानिटकर कसे सामोरे जातील. अप्पू नेत्रा आणि अमेयचे त्या दिवसाचे सत्य जाणून घेण्यात यशस्वी ठरेल का यासाठी ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका स्टार प्रवाहवर (star Pravah) नक्की पहा.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy