Home » ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या मंचावर अंकुश चौधरी झाला भावूक

‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या मंचावर अंकुश चौधरी झाला भावूक

स्टार प्रवाह (Star Pravah ) वरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ ( Mi Honar Superstar) या कार्यक्रमातून बच्चेकंपनीने आपल्या दमदार परफॉर्मन्सने आजवर संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे जज फुलवा खामकर (Phulawa Khamkar), वैभव घुगे आणि सुपरजज अंकुश चौधरी (Ankush Choudhary) कडून या बालकलाकारांचे नेहमीच कौतुक केले जाते. नुकताच या कार्यक्रमात एक डान्स परफॉर्मन्स पाहून जज अंकुश चौधरी भावूक झालेला पहायला मिळाला.

खानदेशच्या प्रथम बोरसे याने नृत्यातून अंकुश चौधरी याचा जीवनपट साकारला. प्रथमने सादर केलेल्या परफॉर्मन्सच्या निमित्ताने अंकुश यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि अंकुश भावूक झालेला पहायला मिळाला. प्रथमचा हा खास परफॉर्मन्स या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

नक्की वाचा: लग्नानंतर ९ महिन्यांचा ब्रेक, ‘श्रीमंताघरची सून’मधील रुपल नंद झळकणार नव्या भूमिकेत

अभिनेता अंकुश चौधरी याचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमातील ‘बहरला हा मधुमास नवा’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे. अंकुश चौधरी आज मराठी सिनेइंडस्ट्रीतला सुपरस्टार आहे. पण त्याचा यशाच्या शिखरावर पोहचण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता.

चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुश चौधरीने नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्याचा हा सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या बच्चेकंपनीने आपल्या नृत्यातून सादर केला आहे.तर मग या बच्चे कंपनीचे असेच एकापेक्षा एक परफॉर्मन्स पहाण्यासाठी ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर न चुकता पहा.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy