Home » Zee Marathi ‘आंबा महोत्सव’ पर्व २ मध्ये कलाकारांची धमाल; ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेची घोषणा

Zee Marathi ‘आंबा महोत्सव’ पर्व २ मध्ये कलाकारांची धमाल; ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेची घोषणा

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या झी मराठीने यंदाही अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात ‘आंबा महोत्सव २०२६’ च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन केले. फळांचा राजा आंबा आणि मनोरंजनाची राणी झी मराठी यांच्या या खास संगमामुळे कलाकार, पत्रकार आणि मान्यवरांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला.

पहिल्या पर्वाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर यंदाचा आंबा महोत्सव अधिक भव्य आणि रंगतदार स्वरूपात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता प्रणव रावराणे आणि अभिनेत्री तनिष्का विशे यांनी केले. त्यांच्या उत्साही सादरीकरणामुळे कार्यक्रमात सुरुवातीपासूनच रंगत आली.

या महोत्सवात ‘सनई चौघडे’, ‘कमळी’, ‘तारिणी’, ‘शुभ श्रावणी’, ‘दीपज्योती’, ‘वीण दोघातली हे तुटेना’, ‘सावळ्याची जणू सावली’, ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘तुला जपणार आहे’ या मालिकांमधील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला. आंब्यावर आधारित मजेशीर खेळ, धमाल स्पर्धा आणि सेटवरील आठवणींमुळे संपूर्ण वातावरण आनंदमयी झाले होते.

कार्यक्रमातील पहिल्याच खेळात कलाकारांच्या जोड्यांमध्ये वर टांगलेल्या टोपलीत सर्वात जलद आंबे पोहोचवण्याची चुरस रंगली. काही कलाकार खेळात सहभागी झाले, तर काहींनी प्रेक्षक बनून या मजेचा मनसोक्त आनंद घेतला. त्यानंतर “आंबा-कारल शॉट्स” या भन्नाट खेळादरम्यान कलाकारांनी शूटिंगदरम्यानचे अनेक मजेशीर किस्से शेअर केले. यामध्ये प्रेक्षकांची लाडकी ज्योतीला कारल्याचा ज्यूस पिण्याची मजेशीर शिक्षा मिळाली.

याच मंचावरून झी मराठीने आपल्या आगामी कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेचा प्रोमोही सादर केला. या मालिकेत ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेत्री निवेदिता सराफ ‘कृष्णा आई’ची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

याशिवाय, या ‘आंबा महोत्सवा’त आणखी एका खास सरप्राईजची चाहूल देण्यात आली. महाराष्ट्रातील लाडक्या वहिनींसाठी “दार उघड बये” म्हणत झी मराठीवर लवकरच कोणीतरी खास येणार असल्याचे संकेत देण्यात आले. तसेच मराठी Z5 ला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंदही यावेळी साजरा करण्यात आला आणि वाहिनीने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले.

परंपरा, संस्कृती आणि प्रभावी कथाकथनाचा संगम साधत झी मराठीने आंबा महोत्सवपर्व २ अधिक दिमाखात आणि उत्साहात साजरा केला.

=====

हे देखील वाचा: ‘प्लस मायनस’ : पुण्याच्या पार्श्वभूमीवर रंगलेली अनपेक्षित प्रेम, मैत्री आणि संघर्षाची भावनिक गोष्ट

=====

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy