Home » वैदेही-सानियाच्या कारस्थानांना कावेरी कशी सामोरी जाणार?

वैदेही-सानियाच्या कारस्थानांना कावेरी कशी सामोरी जाणार?

‘कलर्स मराठी’वरील (Colors Marathi) ‘भाग्य दिले तू मला’( Bhagya Dile Tu Mla) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. राज-कावेरी जोडी ही चाहत्यांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. मालिकेत राज-कावेरी यांच्या लग्नानंतर त्यांचा सुखाचा संसार पाहण्याची चाहत्यांना उस्तुकता होती. पण लग्नानंतर लगेचच रत्नमाला यांना झालेला आजार आणि मग त्यानंतर एकामागून एक अशी संकट या दोघांवर येत गेली. या संकटांवर मात करत हे दोघे पुढे जात असतानाच पुन्हा एकदा वैदेही आणि सानिया त्यांना नव्या संकटात घालत घालणार आहेत.

नक्की वाचा: ‘रंग माझा वेगळा’चे एक हजार एपिसोड पूर्ण, आयेशाच्या परत येण्याने दीपावर नवे संकट

वैदेहीने नुकतीच तिची चहाचा स्टॉल सुरु केला आहे. स्वत: रत्नमाला मोहिते यांनी त्याचे उद्घाटन करत तिला आशिर्वाद दिले. राज तर तिच्या पाठिशी उभा आहे. पण सर्वकाही सुरुळित सुरु असताना वैदेही आणि सानियामुळे कावेरीचा स्टॉलवर कारवाई करण्यात येणार आहे. या स्टॉलसाठी कावेरीने कायदेशीर परवानगी घेतलेली नाही.

त्यामुळे तिच्या स्टॉलला बंद करण्यात येईल. सगळा चहा तसेच सामान रस्त्यावर फेकून देण्यात येईल. आता सानिया वैदेहीच्या या नवीन कारस्थानाला कावेरी कशी सामोरी जाणार, तिच्या मदतीला कोणी येईल का, ती तिचा चहाचा स्टॉल पुन्हा सुरु करेल का यासाठी आपल्याला भाग्य दिले तू मला’ ही मालिका कलर्स मराठीवर नक्की पहा.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy