Home » तारा सुतारीयाच्या ‘अपूर्वा’मधून उलगडणार स्वरक्षणासाठी वाट्टेल ते करणाऱ्या एका स्त्रीचा थरारक प्रवास

तारा सुतारीयाच्या ‘अपूर्वा’मधून उलगडणार स्वरक्षणासाठी वाट्टेल ते करणाऱ्या एका स्त्रीचा थरारक प्रवास

सध्या आपल्याकडे विविध सणांचा काळ सुरु झाला आहे. लहान मोठ्या सणांच्या या काळात मनोरंजनविश्वातील अनेक लहान मोठ्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाल्या आहेत. विविध सणांचे औचित्य साधत अनेक सिनेमे आपल्या भेटीला येणार आहेत. सिनेमा येण्याआधी चित्रपटाचा पहिला लूक जाहीर केला जातो. या लूकवरून प्रेक्षक सिनेमाकडे आकर्षित होतात आणि सिनेमाबद्दल उत्सुकता त्यांच्यात निर्माण होते. त्यामुळे मधल्या काही काळापासून सिनेमाच्या पहिल्या लुकला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. अशातच सिनेमाचा पहिला लूक हटके पद्धतीने समोर आणण्याचा सर्वच निर्माते आणि दिग्दर्शक प्रयत्न करत असतात.

अशातच आता लवकरच अभिनेत्री तारा सुतारीयाचा थ्रिलर असा ‘अपूर्वा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाचा पहिला लूक समोर आला असून, हा लूक चांगलाच चर्चेत आहे. या लुकसोबतच सध्या मीडियामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे ती लूक प्रदर्शित झाला त्या जागेची हो. ‘अपूर्वा’ सिनेमाचा हा लूक एका ऐतिहासिक जागेवर प्रदर्शित केला गेला.

हा लूक दिल्लीच्या लाल किल्ला मैदानावर झालेल्या ‘लव कुश रामलीला’ कार्यक्रमात प्रदर्शित केला गेला. असे पहिल्यांदाच झाले की, या मैदानावर कोणत्याही भारतीय सिनेमाचा पहिला लूक प्रदर्शित केला गेला. असत्यावर सत्याचा विजय आणि वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीची मात असा संदेश देणाऱ्या रामलीलेदरम्यान हा पहिला वाहिला लूक प्रदर्शित झाला. यावेळी असंख्य प्रेक्षक उपस्थित होते. सोबतच अभिनेत्री तारा सुतारिया, राजपाल यादव, अभिषेक बनर्जी हे कलाकार आणि दिग्दर्शक निखिल नागेश भट्ट आदी हजर होते.

दरम्यान ‘अपूर्वा’ ही एका साधारण मुलीची असाधारण गोष्ट आहे. जी अतिशय विचित्र परिस्थितीमध्ये जिवंत राहण्यासाठी वाटेल तर करते. भारतातील भयानक आणि भीतीदायक अशा चंबळ भागात सिनेमाची कथा घडते. सिनेमातील अभिनेत्री या तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटण्यासाठी घरातून निघते आणि रस्त्यात तिचे अपहरण केले जाते. यानंतर सुरु होतो तिचा स्वतःला त्या क्रूर अशा डाकूंपासून वाचवण्याचा जीवघेणा आणि भयंकर खेळ.

या सिनेमात ‘अपूर्वा’ स्वतःला डाकूंपासून वाचवते का?, यात तिला किती कशा अडचणी येतात?, ती या कशा सोडवते की ती यात अडकत जाते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला हा सिनेमा पाहिल्यानंतर मिळतील. मात्र सिनेमाचा पहिला लूक ताराच्या दमदार अभिनयाची झलक दाखवत आहे. यात ती हातात कोयता घेऊन स्वरक्षणासाठी लढताना दिसत आहे. तर मग तयार राहा अतिशय थ्रिलर आणि अंगावर शहारा आणणाऱ्या या ‘अपूर्वा’ला भेटण्यासाठी हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर अर्थात येत्या १५ नोव्हेंबर रोजी हॉटस्टार वर प्रदर्शित केला जाणार आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy