Home » रमाची राघवच्या घरात धडाकेबाज एन्ट्री, नव्या नात्याला होणार सुरुवात?

रमाची राघवच्या घरात धडाकेबाज एन्ट्री, नव्या नात्याला होणार सुरुवात?

‘रमा-राघव’(Rama Raghav) या मालिकेने अल्पावधीतच सगळ्यांना आपलंस केले आहे. या मालिकेतील रमा राघवची जोडी चाहत्यांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. रमा-राघव यांच्यात अजून प्रेम फुललेले पहायला मिळाले नसले तरी त्यांच्यातली ‘तू तू-मै मै’ चाहत्यांना पहायला आवडते. खट्याळ रमा आणि समजूतदार राघव यांची ही जोडी प्रेक्षकांना खूप भावते आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून मालिकेत दर आठवड्याला नवनवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. असाच एक टर्निंग पॉईंट आता मालिकेत येणार आहे.

सौ. कलर्स मराठी

नक्की वाचा: पंचवीस तासांचे शूटिंग आणि अश्रू अनावर, ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेतील अभिनेत्याची भावूक पोस्ट

मालिकेत राघवच्या घरी रमाच्या वडिलांची एन्ट्री झाली आहे. त्यांच्या अशा अचानक येण्याने राघव आणि त्याच्या घरचे दंग राहिले आहेत. रमादेखील तिच्या वडिलांसोबत आपलं सामान घेऊन राघवच्या घरासमोर आलेली असेल. यावेळी रमाचे वडिल राघवच्या वडिलांना रमाला त्यांच्या घरात ठेवून घेण्याची विनंती करतील. आपल्या मुलीवर चांगले संस्कार व्हावेत, या हेतूने ते रमाला राघवच्या घरी पाठवणार आहेत. राघवचे वडिल त्यांना होकार देतील. यानंतर रमाचा राघवच्या घरात गृहप्रवेश होईल आणि रमा राघवच्या नव्या नात्याला सुरुवात होईल.  

सौ. कलर्स मराठी

राघवच्या घरी राहण्यासाठी रमा का तयारी झाली आहे ? रमाच्या मनात राघवसाठी काही आहे का ? राघवच्या घरातील मंडळी रमाचा राग करतात ते रमाला धडा शिकवणार का? रमाच्या मागे राघव घरच्यांविरोधात जावून उभा राहणार का? रमा बदलणार का? ती राघवच्या घरच्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरणार का? रमाला राघवच्या घरात आता आपलेपणा, माया, संस्कार यांची शिदोरी मिळणार का?  पुढे काय काय घडेल हे जाणून घेण्यासाठी रमा राघव मालिका फक्त कलर्स मराठीवर(Colors Marathi) नक्का पहा.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy