Home » Dono Trailer Launch: सनी देओलच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एंट्री; या लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलीसोबत करणार रोमान्स

Dono Trailer Launch: सनी देओलच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एंट्री; या लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलीसोबत करणार रोमान्स

राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या ‘दोनो’ या चित्रपटातून राजवीर देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट सूरज आर बडजात्या यांचा मुलगा अवनीश एस बडजात्या याने दिग्दर्शित केला आहे. अवनीशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ट्रेलर पाहून असे दिसते की त्याची कथा एका मुला आणि मुलीभोवती फिरते जे त्यांच्या मित्राच्या लग्नात भेटतात. या डेस्टिनेशन वेडिंग दरम्यान दोघांमध्ये भांडण, वाद आणि प्रेम निर्माण होते. अवनीशने राजश्रीच्या कौटुंबिक चित्रपटांची परंपरा कायम ठेवली आहे, हे या ट्रेलर मधून दिसून येते. या ट्रेलर लाँच कार्यक्रमात सनी देओल, पूनम ढिल्लन, सूरज बडजात्या आणि चित्रपटातील इतर कलाकारही सहभागी झाले होते. (Dono Trailer Launch)

राजश्री प्रॉडक्शन हाऊसने नवीन कलाकारांना लॉन्च करण्याचा 75 वर्षांचा वारसा सुरू ठेवला आहे. या प्रॉडक्शनमध्ये सर्वच प्रवाहांमधून नवीन कलागुण सादर होत आहेत. राजश्री प्रॉडक्शन (पी) लिमिटेड अवनीश एस बडजात्या दिग्दर्शित जिओ स्टुडिओज “दोनों” (dono the film) च्या संयुक्त विद्यमाने आपला 59 वा चित्रपट सादर करत आहे. कमलकुमार बडजात्या, दिवंगत राजकुमार बडजात्या आणि अजितकुमार बडजात्या यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सूरज आर. बडजात्या हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत.

“दोनों” तुमच्या जवळच्या सिनेमागृहात 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार. (Latest Entertainment News)

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy