Home » लवकरच ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’,अश्विनी कासार पोलीस अधिका-याच्या भूमिकेत

लवकरच ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’,अश्विनी कासार पोलीस अधिका-याच्या भूमिकेत

अभिनेत्री अदिती सारंगधर, शिवानी सोनार, समृद्धी केळकर, किरण धाणे या अभिनेत्री आजवर मालिकामध्ये तडफदार पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत झळकल्या आहेत. त्यानंतर आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हरहुन्नरी अभिनेत्री अश्विनी कासार ही नव्या मालिकेत तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे.


‘कारण गुन्हाला माफी नाही’ ही नवी मालिका सोनी मराठीवर 1 मेपासून सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता भेटीस येईल. अश्विनीचा खाकी वर्दीतला फर्स्ट लूक समोर आला आहे. तिच्या या नव्या भूमिकेसाठी चाहते उस्तुक आहेत. या मालिकेत अश्विनी आपल्याला सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेच्या टीमसोबत दिसणार आहे. हरीश दुधाडे, चंद्रलेखा जोशी यांच्या या स्पेशल ऑप्रेशन स्कॉडच्या टीमसोबत आता अश्विनी सुद्धा दिसेल. याआधी अश्विनीने ‘कमला’, ‘मोलकरीण बाई’, ‘सावित्रीजोती’ सारख्या मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय ‘सोयरे सकळ’ हे नाटक आणि ‘एक होतं माळीण’ या सिनेमात तिने भूमिका साकारल्या होत्या. सासू-सुनांच्या रटाळ मालिका न निवडता अश्विनीने कायम वेगळ्या भूमिका निवडल्या. ‘कमला’ ही तिची पहिली मालिका होती. पण या मालिकेतून तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि मग कधीच मागे वळून पाहिले नाही. ती वेगवेगळ्या भूमिका करत राहिली.


गेल्या दोन-तीन वर्षांपासून मराठी मालिकांमध्ये खाकी वर्दीवर केंद्रस्थानी ठेवून मालिका करण्याचा ट्रेण्ड आला आहे, असं म्हणायला हरकत नाही. ‘अबोली’, ’फुलाला सुगंध मातीचा’, ‘आई मायेचं कवचं’, ‘राजा रानीची गं जोडी’, ‘लक्ष्य’, ‘नवे लक्ष्य’, ‘तुमची मुलगी काय करते’, ‘काय घडलं त्या रात्री’, ‘देवमाणूस’, ‘एक होती राजकन्या’, ‘क्रिमिनल्स-चाहूल गुन्हेगारांची’ या मालिका पोलीस अधिकारी त्यांचे आयुष्य, गुन्ह्यांची विविध प्रकरणं यांवर आधारित होत्या. यापैकी ‘लक्ष्य’, ‘नवे लक्ष्य’, ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘राजा राणीची गं जोडी’, ‘एक होती राजकन्या’, ‘देवमाणूस’ या मालिकांमध्ये महिला पोलीस अधिकारी महत्त्वाच्या भूमिकेत झळकल्या होत्या. या भूमिकांना प्रेक्षकांचे कायम प्रेम मिळत राहिले. त्यामुळेच प्रेक्षकांना अश्निनीच्या ‘कारण गुन्हाला माफी नाही’ या मालिकेकडूनही बऱ्याच अपेक्षा आहेत. अर्थातच त्या अश्विनी पूर्ण करेल यात शंका नाही. अश्विनीला तिच्या या नव्या भूमिकेसाठी आमच्या टीमकडून शुभेच्छा. तुम्ही अश्विनीला या भूमिकेत पाहण्यासाठी किती उस्तुक आहात हे कमेंटमध्ये सांगा. आणि हा लेख आवडला असेल तर नक्की लाईक करा.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy