Home » Scam 2003 Trailer: ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा दमदार टीझर प्रदर्शित

Scam 2003 Trailer: ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा दमदार टीझर प्रदर्शित

Scam 2003

गेल्या अनेक दिवसांपासुन Scam 2003 या नवीन वेबसिरीजची खुप चर्चा आहे.अब्दुल करीम तेलगीच्या भारतातील सर्वात मोठ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची कहाणी, ज्याने देशाला त्याच्या अकल्पनीय प्रमाणाने धक्का दिला. Scam 2003 या शो चा ट्रेलर रिलिज झाला असून या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. इतकंच नव्हे तर प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे या ट्रेलर मध्ये अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकार दिसत आहेत. अभिनेता शशांक केतकर, निखिल रत्नपारखी, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि प्रेक्षकांचा लाडका भरत जाधव देखील या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Scam 2003: The Telgi Story)

हा कलाकार साकारणार तेलगीची भुमिका
ज्येष्ठ रंगभूमी अभिनेते गगन देव रियार या मालिकेत तेलगीची भूमिका साकारताना आहेत अशी चर्चा आहे. हंसल मेहता शोरनर आहेत. Scam 2003 ची निर्मिती समीर नायर यांच्या Applause Entertainment द्वारे केली आहे आणि 1 सप्टेंबर रोजी ही सिरीज SonyLIV वर टेलिकास्ट होईल.

स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ ही सीरिज १ सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित होईल. (Latest Entertainment News)

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy