Home » सुबोध भावे यांनी केले संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चे पहिले पोस्टर आऊट

सुबोध भावे यांनी केले संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चे पहिले पोस्टर आऊट

Sangeet Manapman First poster Out

Sangeet Manapman First poster Out: जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे (Subodh Bhave) यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” (Sangeet Manapman) या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आले आहे. आज प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये सुबोध भावेचा चित्रपटातील एक वेगळा लूक आणि पेहराव पाहता या चित्रपटाची भव्यता कळून येत आहे.
“संगीत मानापमान” या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, प्रसिध्द संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.

सुबोधनं शेअर केलं पोस्टर
गुढी पाडव्याच्या आणि हिंदू नव वर्षाच्या तुम्हा सर्वाना “संगीत मानापमान” च्या संपूर्ण संघाकडून मनःपूर्वक शुभेच्छा.

येत्या दिवाळीत सजणार…
मराठी परंपरेचा साज…
मनामनात गुंजणार…
सुरेल गीतांचा आवाज…..

“संगीत मानापमान” १ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर कलाकृतीवरून प्रेरित, “संगीत मानापमान” हा संगीतमय चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज होणार आहे.

Spread the love

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy