Home » मराठी चित्रपट “सलमान सोसायटी” मधील ‘अभ्यासू कीडा’ सॉन्ग आऊट, उपेंद्र लिमये दिसणार ख़ास भूमिकेत

मराठी चित्रपट “सलमान सोसायटी” मधील ‘अभ्यासू कीडा’ सॉन्ग आऊट, उपेंद्र लिमये दिसणार ख़ास भूमिकेत

‘सलमान सोसायटी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील एक नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाला असून, ‘अभ्यासू कीडा’ असे या गाण्याचे बोल आहेत. अभिनेता उपेंद्र लिमये, विनायक पोतदार आणि नितीन एम यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.

‘सलमान सोसायटी’ चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार यांनी केले आहे, तर निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप , शांताराम खंडू भोंडवे, वैशाली सुरेश चव्हाण यांनी प्राजक्ता एन्टरप्राइजेस बॅनर अंतर्गत केली आहे. ‘सलमान सोसायटी’ हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. “जेव्हा आपला भारत देश साक्षर होईल तेव्हाच भारताचा विकास होईल” या टॅगलाईनवर आधारीत हा चित्रपट आहे. अशा या शैक्षणिक विषयावरील चित्रपटातील ‘अभ्यासू कीडा’ हे गाणे श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केले असून, गायक सुहास सावंत यांनी ते स्वरबद्ध केले आहे. तर गाण्याचे नृत्यदिग्दर्शन अमित बाईंग यांनी केले आहे.

आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा फिल्टर पाड्याचा अशी ओळख असलेला अभिनेता गौरव मोरे देखील या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आपल्या विनोदाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसेल. सोबतच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार हे कलाकार देखील सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहेत. यांच्यापैकी पुष्करने या आधी ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘बाजी’, ‘रांजण’, ‘चि .व चि .सौ. का’, ‘फिरकी’ आणि ‘टी. टी. एम. एम’ झोंबीवली चित्रपटात अभिनय केला आहे.

तर शुभम मोरेने हिंदी चित्रपट ‘रईस’मध्ये बालपणीच्या शाहरुख़ खानची भूमिका बजावली. तसेच ‘हाफ टिकिट’, ‘फास्टर फेणे’ जर्नी सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने ‘हाफ टिकिट’, ‘ताजमहल’ आणि ‘येरे येरे पावसा, माउली’मध्ये भूमिका केल्या आहेत.

चित्रपटा मध्ये उपेंद्र लिमये पहुण्या भूमिकेत आहे. तसेच चित्रपटा मध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ”अभ्यासू कीडा ‘ हे गाणे रसिकांना तसेच बच्चे कंपनी ला भुरळ पाडेल हे नक्की आहे. आता उत्सुकता आहे चित्रपटाच्या ट्रेलर ची जो लवकरच प्रदर्शित होईल. १७ नोव्हेंबर २०२३ ला सर्व चित्रपटग्रहात प्रदर्शित आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy