Home » या अभिनेत्रींचा लग्नानंतरचा मालिकेतला पहिला गुढीपाडवा ठरणार खास,पहायला मिळणार नवीन ट्विस्ट

या अभिनेत्रींचा लग्नानंतरचा मालिकेतला पहिला गुढीपाडवा ठरणार खास,पहायला मिळणार नवीन ट्विस्ट

gudhipadva-celebration-in-marathi-serials

१.कावेरी-राज
‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत कावेरी आणि राजवर्धन यांचे नुकतेच लग्न झाले असून त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. रत्नमाला यांचा आजार, त्यांच्यापासून लपवलेले सत्य, याशिवाय वैदेही आणि सानियाचा त्रास यामध्ये कावेरी-राज दोघेही अडकलेत. गुढी पाडव्याला यातून मार्ग दोघांना सापडेल का? की, हे दोघे या प्रकरणामध्ये अधिकच गुंतत जातील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

२.सायली-अर्जून
‘ठरलं तर मग’ या मालिकेतील सायली-अर्जूनचा लग्नानंतरचा हा पहिलाच सण. गुढीपाडव्याचा सण हे दोघे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य लपवून, घरच्यांसमोर खोट्या प्रेमाचे नाटक करत साजरा करतील. यादरम्यान अस्मिता-प्रिया काही कारस्थान तर रचणार नाहीत ना यासाठी ही मालिका पहावी लागेल. (Tharla Tar Mag)

Image Credit: Google

३.रमा-अक्षय
‘मुरांबा’ मालिकेतील रमा-अक्षयचा लग्नसोहळा खरं तर मागच्या वर्षी पार पडला. पण यंदाचा गुढीपाडवा हा त्यांचा पहिलाच आहे. यानिमित्तानं रमा-अक्षय खऱ्या अर्थाने एकमेकांचे होतील का, रेवा-शशिकांतचा खरा चेहरा,त्यांचे सत्य सगळ्यांसमोर येईल का, रमा आणि अक्षयचं प्रेम जिंकेल की हे दोघे रेवा-शशिकांतच्या नव्या कारस्थात अडकतील? यासाठी ही मालिका स्टार प्रवाहवर नक्की पहा.

४.आनंदी-राघव
‘नवा गडी नवा राज्य’मधील आनंदी-राघव यांची जोडी चाहत्यांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. या गुढीपाडव्याला राघव आणि आनंदीमधला वाद संपून दोघे एकत्र नांदतील की अजून काही विपरीत घडेल आणि यांच्यातला दुरावा वाढत जाईल यासाठी ही मालिका झी मराठीवर पहावी लागेल.

Image Credit: Google

५.संजीवनी- निशांत- ‘शाब्बास सुनबाई’ मालिकेतील संजीवनी-निशांतच्या जोडीने अल्पावधीतच चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यंदाच्या गुढीपाडव्याला संजीवनीच्या घरच्यांसमोर तिचं सत्य येणार का, सत्य समोर आल्यानंतर तिच्या घरच्यांची काय प्रतिक्रीया असेल यासाठी ही मालिका पहावी लागेल.

मालिकाविश्वातील या जोड्यांसह इतरही अनेक मालिकांमध्ये गुढीपाडवा जल्लोषात साजरा होणार आहे. सोबतच नवीन ट्विस्टही पहायला मिळणार आहेत. तर मग यापैकी तुमची आवडती जोडी कोणती हे कमेंटमध्ये सांगा आणि आमचा हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy