Home » ‘श्यामची आई’ चित्रपटाच्या निमित्ताने गायक महेश काळे यांचे ‘या’ क्षेत्रात होणार पदार्पण

‘श्यामची आई’ चित्रपटाच्या निमित्ताने गायक महेश काळे यांचे ‘या’ क्षेत्रात होणार पदार्पण

‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाला प्रदर्शित होऊन अनेक वर्ष झाली. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. खासकरून सिनेमातील गाण्यांनी तर सगळीकडे अफाट लोकप्रियता मिळवली. आजही ती गाणी सगळ्यांच्या ओठांवर आहे. याच सिनेमातून प्रचंड नावलौकिक मिळाला तो गायक महेश काळे यांनी. त्यांनी एक गायक म्हणून मोठी खायती मिळवली मात्र आता ते एका वेगळ्याच भूमिकेतून सगळ्यांच्या समोर येत आहे.

सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तर चित्रपटाचा कृष्ण धवल पटातील अनोखा अंदाज पाहून प्रत्येकजण याच्या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसला आहे. चित्रपटाचा लूक ते कथा, संवाद, सादरीकरण याबाबतीत अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी समोर येत असतानाच चर्चा सुरु झाली आहे, ती ‘श्यामची आई’ चित्रपटातील गाण्यांची.

शास्त्रीय संगीताचे उपासक राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक श्री. महेश काळे यांनी. ‘श्यामची आई’ चित्रपटात साने गुरुजींनी लिहिलेली ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..’ ही प्रार्थना नव्या सुरात आणि चालीत गुंफुन आपल्यासमोर गाणं स्वरूपात आणली आहे. या गाण्यासंदर्भात बोलताना महेश काळे म्हणाले, “माझं काम पाहिलं तर जगाला आनंद वाटण्याचं काम आहे. काही वेळेला गाणं गाऊन, काही वेळी त्याच्याबद्दल मत प्रदर्शन करून तर केंव्हा केंव्हा नुसतं ऐकून तर कधी संगीतबद्ध करून गाण्याची वेगवेगळी आयामं मी माझ्या कामातून समोर आणत असतो. गायक म्हणून आपण तन्मयतेने तल्लीनतेने प्रेम वाटत असतो. पण त्याला जर सामाजिक भावनेची झालर मिळाली तर या सगळ्या कार्याला एक वेगळं स्थान प्राप्त होतं. किंबहुना मला असं वाटतं ज्या समाजाने मला प्रेम दिलंय त्या समाजाचं मी देणं लागतो. याचा विचार करताना या प्रार्थनेला चाल लावण्याचे भाग्य मिळणं ह्यातून समाजाची परतफेड करण्याची संधी मला मिळाली. हे गाणं नसूम प्रार्थना आहे, नव्हे एक संवेदना आहे. गाण्याचे शब्द कायम लक्षात राहतील यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केले आहेत”.

‘श्यामची आई’ या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये,उर्मिला जगताप,अक्षया गुरव, दिशा काटकर,मयूर मोरे ,गंधार जोशी , अनिकेत सागवेकर ही मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy