Home » ३ दिवस उपाशी राहून अन् फक्त वोडका पिऊन पृथ्वीराज सुकुमारनने दिला ‘तो’ न्यूड सीन

३ दिवस उपाशी राहून अन् फक्त वोडका पिऊन पृथ्वीराज सुकुमारनने दिला ‘तो’ न्यूड सीन

Prithviraj Sukumaran in 'The Goat Life'

साऊथचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन हा सध्या त्याच्या ‘आदुजीवितम: द गोट लाइफ‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट्सपैकी एक आहे. पृथ्वीराजने १६ वर्षांपासून या चित्रपटासाठी तयारी केली तेव्हा कुठे २०२४ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करण्यात त्याला यश मिळालं आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पृथ्वीराजला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. एवढेच नाही तर या सिनेमातील पात्रासाठी पृथ्वीराज सुकुमारन तब्बल तीन दिवस ना अन्न पाण्याला शिवलादेखील नाही. इतकंच नाही तर त्याने या भूमिकेचं गांभीर्य जाणून तिच्याशी समरस होण्यासाठी दारूचेही सेवन केले होते. हा खुलासा सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर सुनील केएस यांनी केला आहे. (Prithviraj Sukumaran in ‘The Goat Life’)

सुनील केएस यांचा आदुजीवितम आणि पृथ्वीराज सुकुमारनबद्दल बोलत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. याच व्हिडीओमध्ये त्यांनी या भूमिकेसाठी पृथ्वीराजने घेतलेल्या मेहनतीबद्दल भाष्य केलं आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान पृथ्वीराज सुकुमारने तीन दिवस खाणे-पिणे बंद केले होते आणि इतकंच नव्हे तर सिनेमात एखादा न्यूड सीन देण्यासाठी पृथ्वीराजने अन्नाऐवजी दारूचे सेवन केले होते.

सुनील म्हणाले, “न्यूड सीनसाठी पृथ्वीराज सुकुमार हा तीन दिवस जेवला नव्हता आणि शेवटच्या दिवशी पाणीदेखील प्यायला नव्हता. शुटिंगपूर्वी त्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण अगदी नगण्य असावे यासाठी तो ३० मिली वोडका प्यायला होता. त्याच्यात अजिबात ताकद राहिलेली नव्हती शूटिंगपूर्वी त्याला खुर्चीवर बसवून लोकेशनवर नेण्यात आले आणि शॉट करण्यापूर्वी त्याला खुर्चीवरून उचलावे लागले होते.”

आदुजीवितम ही केरळमधील एका तरुण कामगाराची कथा आहे. नोकरीच्या शोधात तो मिडल ईस्टसारख्या देशात पोहोचतो आणि तिथे तो मजूर बनतो. या काळात तो किती संघर्ष करतो आणि तो कसा टिकून राहतो याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. या भूमिकेत येण्यासाठी पृथ्वीराज सुकुमारने प्रचंड मेहनत घेतली अन् पडद्यावर पाहताना त्याबद्दल जाणवत आहे. प्रेक्षकांनीही पृथ्वीराजच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे तसेच समीक्षकांच्याही हा चित्रपट पसंतीस पडला आहे. जवळपास दहा वर्षांपासून तो या गंभीर व्यक्तिरेखेच्या तयारीत व्यस्त होता अन् आता या मेहनतीचं चीज झाल्याचं या चित्रपटाच्या यशावरुन सिद्ध झालं आहे.

पृथ्वीराज सुकुमारनचा सालार हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटामध्ये प्रभासनेदेखील प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘आदुजीवितम: द गोट लाइफ’ या चित्रपटाला ए.आर.रहमान यांनी संगीत दिलं आहे. आदुजीविथम: द गोट लाइफ या चित्रपटाचे दिग्दर्शन ब्लेसी यांनी केलं आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन व्यतिरिक्त अमला पॉलनं देखील काम केलं आहे. लवकरच पृथ्वीराज हिंदीतही पदार्पण करणार आहे. अक्षय कुमार व टायगर श्रॉफच्या आगामी ‘बडे मियां छोटे मियां’मध्ये पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

=====

हे देखील वाचा: The Goat Life Review: हृदयद्रावक जीवनाचा पट!

=====

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy