Home » Heeramandi Jewellery: हिरामंडीच्या दागिन्यांची मोहीनी

Heeramandi Jewellery: हिरामंडीच्या दागिन्यांची मोहीनी

by सई बने
Heeramandi Jewellery

हिरामंडी: द डायमंड बझार‘ या संजय लीला भन्साळी यांच्या पहिल्या वबेसिरीजचे नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर शानदार लॉन्चिंग झाले आहे. संजय लीला भन्साळी यांचे नाव आले की एक शब्द येतो, तो म्हणजे, भव्यदिव्य. भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या सर्वच चित्रपटांचे असेच स्वरुप होते. मोठे, भव्य, राजेशाही थाटाचे सेट. त्याला साजेसे त्यातील कलाकारांचे कपडे, आणि दागिने. ही भन्साळी यांच्या दिग्दर्शनाची एक खुबी राहिली आहे. वेबसिरीजच्या क्षेत्रात पदार्पण करतांना भन्साळी यांनी आपली ही खुबी सांभळली आहेच, शिवाय त्यात आणखी विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. हिरामंडीची घोषणा केल्यावर पहिल्यांदा भन्साळी यांच्यावर टिका झाली. मात्र हिरामंडी म्हणजे काय, स्वातंत्र्यलढात त्यातील कलाकारांचे योगदान किती आहे. याची अभ्यासपूर्ण माहिती भन्साळी यांनी या सिरीजच्या माध्यमातून मांडली असल्याचे स्पष्ट झाल्यावर हे आरोप दूर झाले.

अर्थातच भन्साळी यांनी या आरोपांपेक्षा हिरामंडीमधील स्त्रियांचे जीवन पुन्हा एकदा साकार करण्याचा प्रयत्न केला. हिरामंडीमध्ये फक्त भारतातीलच नव्हे तर परदेशातील स्त्रियाही आपली कला सादर करण्यासाठी येत असत. त्या उत्तम गायक, वादक आणि नृत्यविषारद असायच्या. स्वातंत्र्य लढ्यात या सर्वांची भूमिका महत्त्वाची होती. गुप्तहेर म्हणून त्यांनी काम केलेच, शिवाय स्वातंत्र्य लढ्यासाठी आर्थिक मदतही हिरामंडीमधून झाली. या महिला कलेच्या उपासक होत्या. उत्तम कपडे आणि हिरे, मोती, सोन्याचे दागिने या बाबत त्या चोखंदळ होत्या. हाच चोखंदळपणा भन्साळी यांनी हिरामंडीमध्ये जपला आहे. त्यामुळेच सध्या हिरामंडीमधील पोशांखांची जशी फॅशन आली आहे, तशीच त्यातील दागिन्यांचीही मागणी वाढली आहे.

Heeramandi Jewellery

‘हिरामंडी: द डायमंड बझार’ या वेब सीरिजसाठी मुघल ज्वेलरी डिझाईन्स बनवण्याचे आव्हान होते. यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिल्लीच्या श्री परमणी ज्वेलर्स (SPJ) ला पसंती दिली. गेल्या २०० वर्षापासून ज्वेलरीच्या व्यवसायात असलेल्या परमणी ज्वलर्सनं हे आव्हान स्विकारलच. पण या दागिन्यांनी सध्या असलेली क्रेझ पहाता हे आव्हान यशस्वीही केल्याचे स्पष्ट झाले आहे. हिरामंडीचे दागिने बनवण्यासाठी भन्साळी यांनी पहिल्यांदा श्री परमणी ज्वेल्सचे संस्थापक विनय गुप्ता यांची भेट घेतली. त्यांना हिरामंडीची कथा समजून सांगितली. शिवाय या वेबसिरिजमध्ये ज्या कलाकार आहेत, त्या सर्वांचा परिचय दिला. त्या कोणती भूमिका करणार आहेत, त्या भुमिकेचे स्वरुप त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विनय गुप्ता यांनी प्रत्येक कलाकारानुसार हे दागिने बनवले आहेत. यासाठी स्वतः संजय लीला भन्साळी तासनतास बसून दागिन्यांच्या डिझाईन्सवर चर्चा केली आहे.

हिरामंडीच्या दागिन्यांमध्ये पासा, टिका, नाथ आणि हार या दागिन्यांचा जास्त वापर करण्यात आला आहे. यापैकी काही दागिन्यांना मोत्यात मढवण्यात आलं आहे, तर काहींसाठी हि-यांचा वापर करण्यात आला आहे. काही दागिने हे रंगीत मिनाकारीमध्ये तयार करण्यात आले आहेत. दागिने तयार करतांना ते कुठले कलाकार घालणार आहेत, त्यांचा पोशाख कुठला आहे आणि ते कशाप्रकारचे गाणे, नृत्य सादर करणर आहेत, या सर्वांचा विचार करण्यात आला आहे. परमणी ज्वेलर्स तर्फे जवळपास १०,००० दागिन्यांचे नमुने तयार करण्यात आले. यासाठी अनेक कारागिरांनी मेहनत घेतली. हे दागिने तब्बल ३०० किलोपर्यंत वजनाचे झाले आहेत. त्यासाठी ५०० वर्षाच्या इतिहासाचा अभ्यास करण्यात आला. श्री परमणी ज्वेल्सचे संस्थापक विनय गुप्ता यांनीही यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. आज गुप्ता परिवाराची सहावी पिढी या व्यवसायात आहे. त्यांच्याकडे नवाबकालीन अनेक दागिन्यांच्या डिझाईन परंपरागत आहेत. या नवाबकालीन डिझाईन्सचा वापर हिरामंडीसाठी करण्यात आला आहे.

Heeramandi Jewellery

भन्साळी आणि गुप्ता यांनी घेतलेल्या या मेहनतीला मोठे यश आले आहे. कारण जेव्हापासून हिरामंडीचे फोटो सोशल मिडियावर यायला लागले आहेत, तेव्हापासून या दागिन्यांची मागणी वाढायला लागली आहे. पासा, टिका, नथ आणि हार यांच्या डिझाईन्स हिरामंडीमधील दागिन्यांसारख्याच हव्यात म्हणून मागणी येत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. अन्य ठिकाणीही या दागिन्यांना मागणी आली आहे. हिरामंडीमध्ये जे दागिने वापरले आहेत, त्यात सोन्याचा वापर आहे. मात्र आर्टिफिशल ज्वलरीमध्येही या दागिन्यांची मागणी वाढली आहे. हिरामंडीमधील मोत्याचा मांगटिका हा जास्त लोकप्रिय झाला आहे. हिरामधील दागिन्यांवर कुंदन सेटिंग, फिलीग्री वर्क आणि इनॅमल यांसारख्या नाविन्यपूर्ण तंत्रांचा वापर केला आहे. तसेच दागिने आता बाजारत विक्रीसाठीही आले आहेत.

=====

भन्साळींच्या ‘हिरामंडी’मागचा ‘हा’ इतिहास ठाऊक आहे का?

The Sabarmati Report Teaser: अंगावर शहारे आणणारा ‘द साबरमती रिपोर्ट’

=====

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy