Home » भन्साळींच्या ‘हिरामंडी’मागचा ‘हा’ इतिहास ठाऊक आहे का?

भन्साळींच्या ‘हिरामंडी’मागचा ‘हा’ इतिहास ठाऊक आहे का?

Heeramandi Netflix

लार्जर दॅन लाईफ सिनेमांसाठी ओळखले जाणारे भारतीय दिग्दर्शन संजय लीला भन्साळी हे सध्या त्यांच्या आगामी ‘हिरामंडी’ या वेबसीरिजनिमित्त चांगलेच चर्चेत आहेत. पीरियड सिनेमांमध्ये भन्साळी यांचा हात धरणं हे अद्याप कोणालाही शक्य झालेलं नाही. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग हे त्यांच्या चित्रपटात ज्यारीतीने काळ उभा करतात अगदी तसंच काहीसं काम आपल्याला बॉलिवूडमध्ये भन्साळी यांच्या सिनेमांमधून पाहायला मिळतं. ‘देवदास’,’ हम दील दे चुके है सनम’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ ते नुकत्याच आलेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’पर्यंतच्या कित्येक चित्रपटांमधून आपण खास भन्साळी टच अनुभवला आहे, आता हाच खास भन्साळी टच पुन्हा एकदा नेटफ्लिक्सच्या आगामी ‘हिरामंडी’ या वेबसीरिजमधून अनुभवायला मिळणार आहे. (History of Heeramandi)

गेली २ वर्षं भन्साळी यांच्या या प्रोजेक्टबद्दल मनोरंजनविश्वात प्रचंड चर्चा होती. मध्यंतरी या सीरिजचा फर्स्ट लूक समोर आला आणि भन्साळी यांनी यासाठी किती मेहनत घेतली आहे याची झलकदेखील यात पाहायला मिळाली. अत्यंत भव्यदिव्य पद्धतीने भन्साळी हा विषय सादर करणार यात काहीच वाद नाही, पण ‘हीरामंडी’चा नेमका इतिहास अन् नेमका हा विषय इतका का चर्चेत आहे, याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत.

‘हीरामंडी’ हा पाकिस्तानच्या लाहोर शहरातील एक फार जुना परिसर आहे. वैश्याव्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेला हा परिसर आधी ‘शाही मोहल्ला’म्हणून ओळखला जायचा. हिरा सिंग यांचे सुपुत्र ध्यान सिंग डोगरा यांच्या नावा वरुन या परिसराला ‘हीरामंडी’ हे नाव पडले होते. ध्यान सिंग डोगरा हे महाराज रणजीत सिंग यांच्या राज्यात शीख साम्राज्याचे प्रधान होते. १४ व्या आणि १५ व्या शतकात म्हणजेच मुघल काळात ‘हीरामंडी’ हा परिसर वेश्या व्यवसायाचं केंद्र बनला होता अन् बऱ्याच लोकांना हा परिसर केवळ त्यामुळेच जास्त लक्षात राहिला. अफगाणिस्तान व उझबेकिस्तानातून लुटमार करून जेव्हा मुघल आपल्याबरोबर स्त्रियांना घेऊन येत असत तेव्हा त्यांना या परिसरात शास्त्रीय नृत्य शिकवलं जात असे.

अहमद शहा अब्दालीने आक्रमण केल्यानंतर ‘हीरामंडी’मध्ये वेश्या व्यवसाय वाढू लागला असंही काही इतिहासकारांनी स्पष्ट केलेलं आहे. बंदी बनवून आणलेल्या स्त्रियांना या व्यवसायासाठी जबरदस्ती तयार केले जात असे. त्यांना नृत्य, शृंगार, तिथल्या प्रथा चालीरीती सगळं शिकवलं जात असे. दिवसा नेहमीप्रमाणे खाद्यपदार्थ, कपडे, वाद्य, मुघल पादत्राणे, आणि इतर वस्तु या बाजारात विकल्या जायच्या अन् रात्री मात्र हा बाजार वेश्या व्यवसायासाठी खुला व्हायचा अशी इथली रीत होती. मुघल काळातील ‘तवायफ प्रथा’ अन् त्यामध्ये भरडल्या जाणाऱ्या निष्पाप महिला अन् ‘हीरामंडी’चा हा वादग्रस्त इतिहास या भव्य सीरिजमधून दाखवला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. (Heeramandi: The Diamond Bazaar)

पाकिस्तानी लोक मात्र भन्साळी यांच्या या सीरिजच्या विरोधात आहेत. एखादा भारतीय फिल्ममेकर भारतात राहून पाकिस्तानविषयी चित्रपट कसा बनवू शकतो असं काही लोकांचं म्हणणं आहे. प्रसिद्ध लेखक मोईन बेग यांनी १४ वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी यांना ‘हीरामंडी’ या प्रोजेक्ट संदर्भात मार्गदर्शन केले होते व ही कहाणी त्यांच्या सुपूर्त केली होती. त्यावेळी भन्साळी शाहरुख खानच्या ‘देवदास’मध्ये व्यस्त होते. नंतरही भन्साळी यांनी यात फार रस न दाखवल्याने मोईन बेग यांनी आपली कथा भन्साळी यांच्याकडून पुन्हा मागितली. सर्वप्रथम ही कथा चित्रपट रूपात सादर होणार होती पण आता नेटफ्लिक्ससारख्या बड्या प्लॅटफॉर्मवर ही सीरिज झळकेल याचा विचार कुणीच केला नसेल. आपल्या भव्यदिव्य स्टाईलने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या खास भन्साळी टचची जादू ओटीटीवर चालणार की नाही ते येणारा काळच ठरवेल.

=====

हे देखील वाचा: अकरावी नापास ते इंडियन मायकेल जॅक्सन, असा होता प्रभुदेवाचा स्ट्रगल

=====

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy