Home » ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेरावची लेकासाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेरावची लेकासाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi hasyajatra) या कार्यक्रमामधून अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata sambherao) घराघरात लोकप्रिय झाली. तिने साकारलेले लॉलीचे पात्र चाहत्यांचे आवडते कॉमेडी पात्र आहे. या पात्राने अगणितवेळा प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. पण आज सगळ्यांना हसवणारी नम्रता भावूक झालेली पहायला मिळाली. तिने आपल्या लेकासाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

सौ.इस्टाग्राम

नम्रताने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाची संपूर्ण टीम आणि त्यांचे कुटुंब पाहायला मिळत आहे. यामध्ये नम्रताचे कुटूंब देखील दिसत आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे की,“निघालो साता समुद्रापलीकडे फॅमिली पासून दूर, महिनाभर लेकरापासून लांब चाललेय जड पावलांनी निरोप घेताना ऊर भरून आला होता. पण हरकत नाही, नाटकाचा अमेरिका दौरा यशस्वीरीत्या पार करून येऊच लवकर तूर्तास बाय बाय”.

नक्की वाचा: ‘नवे लक्ष्य’ मालिकेतील अभिनेत्री शुभांगी सदावर्तेचे सिनेमात पदार्पण

सौ.इस्टाग्राम

नम्रता छोट्या पडद्यासोबतच नाटकामध्येही काम करते. ती अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या ‘कुर्रर्रर्रर्र’मध्ये सध्या झळकते आहे. या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेला गेली आहे. यावेळी लेकापासून महिनाभर लांब रहावे लागणार यासाठी ती भावूक झालेली पहायला मिळाली. ‘कुर्रर्रर्रर्र’ या नावावरुनच तुम्हाला कळाले असेल ही हे नाटक मातृत्त्वाच्या संवेदनशील विषयावर आधारित आहे. या नाटकात नम्रतासोबतच प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि पंढरीनाथ कांबळे हे कलाकार काम करत आहेत.

 

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy