Home » ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील साजिरी ‘मन धागा धागा जोडते नवा’मध्ये आनंदीच्या भूमिकेत

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील साजिरी ‘मन धागा धागा जोडते नवा’मध्ये आनंदीच्या भूमिकेत

स्टार प्रवाह (Star Pravah ) वरील मुलगी झाली हो (Mulagi Zali Ho) मालिकेतील साजिरी म्हणजेच माऊ पुन्हा एकदा नव्या मालिकेतून आपल्या भेटीस येत आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga JOdate Nava) या मालिकेचा प्रोमो समोर आला असून या मलिकेत अभिनेत्री दिव्या पुगावकर ‘आनंदी’ या भूमिकेत झळकेल. एखाद्या मुलीचा घटस्फोट झाला म्हणजे तिचे आयुष्य संपत नसते. घटस्फोट हा त्या नात्याचा अंत आहे युष्याचा नाही. त्या मुलीला पुन्हा नव्याने आनंदी आयुष्य घालवण्याचा अधिकार आहे. आणि हा तिचा प्रवास तिच्या घरातील मंडळींमुळेच सुखकर होवू शकतो. हा या मालिकेचा विषय आहे.

नक्की वाचा:भांडी घासली, दुध-अंडी-चणे विकले, ’ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अभिनेत्री सुप्रिया पाठारेंचा संघर्षमय प्रवास

मालिकेचा प्रोमोमध्ये घटस्फोटित आनंदी माहेरी जेवण बनवताना दिसतआ आहे. ती जेवणात वेगळेपण आणते यावरुन तिचा भाऊ तिला टोचून बोलतो आणि म्हणूनच हिला नवऱ्याने सोडली असेल असे बोलून जातो. आनंदीचे बाबा आणि वहिनी तिची पाठराखण करण्याचा प्रयत्न करतात पण तो व्यर्थ ठरतो. तिची आईदेखील तिला घालूनपाडून बोलते. तिच्या आला फक्त लोक काय म्हणतात हाच विचार सतावत असतो. आता या नकारात्मक परिस्थितीवर मात करत आनंदी आपले आयुष्य पुन्हा आनंदी कसे बनवेल.तिच्या आयुष्यात नवीन कोणी येईल का. आनंदी आपल्या नव्या आयुष्याला पुन्हा कशी सुरु करेल. आनंदीने घटस्फोट का घेतला. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तर आपल्याला ही मालिका सुरु झाल्यावर हळूहळू मिळत जातील.

या मालिकेत आनंदीची भूमिका साकारणारी दिव्या तिच्या भूमिकेसाठी खूपच उस्तुक आहे. तिने सांगितले की, ‘मुलगी झाली हो’ मालिकेत न बोलता खूप काही व्यक्त करण्याचे आव्हान होते. या मालिकेत मी बोलणार तर आहे, पण मनात खूप साऱ्या भावना साचवून. त्यामुळे आनंदी ही व्यक्तिरेखा एक अभिनेत्री म्हणून जास्त आव्हानात्मक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अभिनेत्याला स्क्रीनवर पहात आले आहे. त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळणे हे स्वप्नवत आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे हे लवकरच तुम्हाला कळेलच. पण या मालिकेच्या रुपात नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आनंदी साकारण्यासाठी सध्या मी माझ्या भाषेवर आणि आवाजावर काम करते आहे.

यावरुन आनंदीचा जोडीदार पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच उस्तुक असाल. दिव्याची पहिली मालिका ‘मुलगी झाली हो’ही टीआरपीच्या रेसमध्ये कित्येक महिने टॉप ५ मध्ये राहिली आहे. त्यातील माऊ या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम आनंदीलाही मिळेल याची दिव्याला खात्री आहे. तर मग नवी मालिका ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही ८ मे पासून सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर नक्की पहा.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy