Home » कॉमेडी किंग भरत जाधव यांच्या आगामी “लंडन मिसळ” चित्रपटाचा फुल टू धमाल ट्रेलर प्रदर्शित

कॉमेडी किंग भरत जाधव यांच्या आगामी “लंडन मिसळ” चित्रपटाचा फुल टू धमाल ट्रेलर प्रदर्शित

मागील अनेक दिवसांपासून मराठी मनोरंजनविश्वात एका सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तो सिनेमा म्हणजे अतिशय चांगल्या आणि मोठ्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘लंडन मिसळ’. हटके नाव असलेल्या या सिनेमाने घोषणेपासूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. आता अखेर या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर समोर आला आहे.

‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेते भरत जाधव बऱ्याच काळानंतर सिनेमात काम करताना दिसणार आहे. ते एका अत्यंत हटके अशा प्रमुख भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतील. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे. या सिनेमाचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावर प्रेरित आहे.

लंडन मिसळ सिनेमाचा ट्रेलर कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच एका मोठ्या सोहळ्यात रिलीज करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशिय चिटणीस श्री.श्रीकांत भारतीय हे चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. चित्रपटातल्या चटपटीत सीन्सनी, धमाल कॉमेडीने आणि कलाकारांच्या जिवंत अभिनयाने भरलेला हा ट्रेलर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रितिका आणि ऋतुजाचे चित्रपटातील लूक्स कथेतील उत्सुकता वाढवता तर आपल्या अभिनयातून भरत जाधव पुन्हा एकदा विनोदाची चौफेर फलंदाजी करताना दिसत आहे. हास्यजत्रा फेम गौरव मोरेनेही नेहमीप्रमाणे हास्याचे षटकार मारत सर्वांनाच त्याची दखल घ्यायला भाग पाडले आहे. त्यामुळे अर्थातच चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता वाढलीय.

वैशाली सामंत, रोहित राऊत, वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर चित्रपटाची गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि समीर सामंत यांनी लिहिली आहेत. वैशाली सामंंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.

आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची ही कथा आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे ‘लंडन मिसळ’. नाटक, अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी आपल्याला या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे.

चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सोबतच प्रतिभावान अभिनेते भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार असून, ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असेल.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy