Home » कलर्स मराठीवरील ‘या’ दोन लोकप्रिय मालिकांचा होणार महासंगम, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला

कलर्स मराठीवरील ‘या’ दोन लोकप्रिय मालिकांचा होणार महासंगम, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला

सध्या चॅनेलवरील विविध मालिकांचा महासंगम होणे खूपच सामान्य झाले आहे. मालिकांमध्ये विविध ट्विस्ट आणण्यासाठी अनेकदा चॅनेलकडून दोन मालिकांचे काही भाग एकत्रितपणे दाखवले जातात. हिंदीमध्ये या गोष्टी नेहमीच घडताना दिसतात. मात्र आता मराठीमध्ये देखील याचे प्रमाण वाढले आहे. दोन मालिकांमध्ये मोठे ट्रॅक आणताना असे महासंगम दाखवले जातात.

अशातच आता मराठी मालिकाविश्वातील आणि कलर्स मराठी वाहिनीवरील दोन लोकप्रिय मालिका असलेल्या ‘भाग्य दिले तू मला’ व ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकांचा मिलाप होणार आहे. या मालिकांतील लोकप्रिय जोडी म्हणजेच ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील राजवर्धन-कावेरी आणि ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ मालिकेतील अर्जुन-सावि आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे.

सध्या दोन्ही मालिकांमध्ये विविध कारणांमुळे नात्यांमध्ये मोठा दुरावा आला आहे. सर्व नात्यांना एकत्र आणण्यासाठी हा महामिलाप होणार आहे. एकीकडे राज आणि त्याच्या आईच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे अर्जुन आणि साविच्या नात्यात देखील दरी निर्माण झाली आहे. आता राज-कावेरी, अर्जुन-सावि यांना एकत्रित येऊन कोणत्या मोठ्या संकटाला सामोरं जावे लागणार आहे हे लवकरच समजेल.

सध्या या महामिलापचे अनेक प्रोमो टीव्हीवर झळकत असून, सोशल मीडियावरही ते कमालीचे व्हायरल झाले आहेत. कावेरी आणि सावि त्यांच्या युक्तीने सगळ्यांना या संकटातून बाहेर काढू शकतील का? भाग्य जपणारी कावेरी आणि प्रेम जपणारी सावि राज आणि अर्जुनाची समजूत काढू शकतील का? या महासंगमामुळे दोन्ही जोडप्यांच्या आयुष्यात काय बदल होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या २३ नोव्हेंबरला या विशेष भागात मिळतील. तेव्हा नक्की पहा महासंगम गुरुवारी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy