हिंदी सिनेमा ओळखला जातो ते म्हणजे रोमान्सच्या ‘सिलसिला’साठी. पडद्यावरचा हा रोमान्सचा ‘सिलसिला’ अनेकदा बॉलीवूड कलाकारांच्या आयुष्यात मोठ वादळ घेवून आला आहे. असाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अमिताभ आणि रेखाच्या प्रेमाचा ‘सिलसिला’ तर जगजाहीर आहे. पण जेव्हा अमिताभ रेखा एकमेकांच्या खूपच जवळ आले तेव्हा जया बच्चन यांनी आपला संयम गमावला आणि जया बच्चनने फिल्मच्या युनिटसमोर रेखाच्या सणसणीत कानाखाली लगावली होती. हे केव्हा घडलं, जया बच्चन यांचा संयम का संपला, हा प्रकार कोणत्या सिनेमाच्या शुटिंगदरम्यानं घडला, त्यावर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रीया काय होती, पुढे रेखाने काय केले हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अमिताभ-रेखा एका सिनेमासाठी एकत्र काम करणार होते. पण शूटिंगच्या काही दिवसातच अमिताभ बच्चन यांना त्या फिल्ममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि या दोघांची भेट झाली नाही. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. आणि म्हणूनच अमिताभ रेखा पुन्हा भेटले यावेळी निमित्त होत्या त्या जया भादुरी. या भेटीगाठी जया-अमिताभच्या लग्नाआधीच्या होत्या. खरंतर सुरुवातीच्या काळात रेखाचं नात अमिताभ बच्चन ऐवजी जया भादुरीसोबत जास्त जवळचं होते.
करियरच्या सुरुवातीच्या दिवसांत या दोघी एका बिल्डिंगमध्ये राहत हत्या. रेखा यांचे जया यांच्या घरी येणे-जाणे होत्या. रेखा जया भादुरीला दीदी भाई म्हणजेच मोठी बहिण म्हणून हाक मारायच्या. या काळात जया बच्चन यांचं नाव मोठं होतं. अमिताभ,रेखा सुपरस्टार नव्हते. त्यांनी एकत्र कामही केलेले नव्हते. जया भादुरीकडे अमिताभ यांचे येणे-जाणे असायचे तेव्हाच रेखा आणि अमिताभ यांची भेट होत असायची, बोलणे व्हायचे, गप्पा रंगायच्या.
अमिताभ आणि रेखा या दोघांना १९७६ ला ‘दो अन्जाने’ सिनेमासाठी साईन करण्यात आले. कोलकातामध्ये तब्बल एक महिना या फिल्मचे शुटिंग झाले. मुंबईत येण्याआधी अमिताभ बच्चन यांनी कोलकातामध्ये नोकरी केली होती. त्यांना कोलकाताचा कानाकोपरा माहित होता. म्हणूनच फावल्या वेळात ते रेखाला कोलकाता फिरवायला घेवून जात. यादरम्यान अमिताभ आणि रेखा ‘दो अन्जाने’ राहिले नाहीत. तर एकमेकांच्या खूप जवळ आले.
बॉक्स ऑफीसवर ही जोडी हीट ठरली. मग या जोडीचा फिल्मी सिलसिला सुरु झाला. या दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केले. आणि हे दोघे अधिकच जवळ येत गेले. वृत्तपत्र, सिनेइंडस्ट्री, कलाकार, मित्रमंडळी,चाहते सगळ्यांच्या ओठांवर यांच्या रोमान्सचे किस्से चवीने चघळले जात होते. जया बच्चन यांच्या कानावर या गोष्टी आल्या होत्या. पण अमिताभ-रेखा ही जोडी ऑनस्क्रीन हीट असल्यामुळे त्या दुर्लक्ष करत राहिल्या.
अखेर त्या एका प्रसंगानंतर दोघांचे अनऑफिशीअल अफेअर ऑफिशील झाले. एक दिवस असा आलाच की, जया बच्चन यांचा संयम संपला. प्रोड्युसर टिटो यांनी अमिताभ आणि रेखा या जोडीला ‘राम बलराम’ या सिनेमासाठी साईन केले. मग काय जया यांनी थेट टिटो यांने गाठले. योगायोग म्हणजे अमिताभ आणि रेखा यांचा पहिला सिनेमा ‘दो अन्जाने’चे प्रोड्युसर देखील टिटोच होते. जया बच्चन यांनी टिटो यांच्यावर या सिनेमात रेखाला घेण्यात येवू नये यासाठी दबाव टाकला. टिटोंनी तो मान्यही केला. मात्र जेव्हा ही गोष्ट रेखा यांच्या कानावर आली. तेव्हा त्यांनी टिटो यांना एक ऑफऱ केली. या ऑफरला टिटो नकार देवूच शकले नाहीत आणि त्यांनी रेखा यांना सिनेमातून काढले नाही.
त्यावेळी रेखा आणि अमिताभ यांचे अफेअर एवढे रंगात आले होते की, रेखा यांना अमिताभसोबत वेळ घालवायची एवढी मोठी संधी गमवायची नव्हती. आणि म्हणूनच रेखा यांनी हा चक्क सिनेमा फ्रीमध्ये केला. मग काय जया बच्चन यांनी अमिताभ यांना तो सिनेमा सोडण्यास सांगितले. पण आपण हा सिनेमा सोडला तर प्रोड्युसरचे मोठे नुकसान होईल. याशिवाय ते अनप्रोफेशनल वागणे शक्य होईल, असे कारण अमिताभ यांनी पुढे केले. सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाली आणि पुन्हा अमिताभ-रेखाच्या अफेरच्या चर्चांना उधाण आले.
अखेर एक दिवस जया बच्चन यांनी थेट फिल्मचा सेट गाठला. आणि तिथे जे झाले ते व्हावं असं जया बच्चन यांना मुळीच वाटत नव्हते. त्या सेटवर पोहचल्या तेव्हा त्यांना अमिताभ आणि रेखा एका कोपऱ्यात गप्पा मारताना दिसले. हे पाहून जया बच्चन संतापल्या. त्या ठिकाणी जया आणि रेखामध्ये मोठे भांडण झाले आणि मग संतापलेल्या जया बच्चन यांनी रेखा यांच्या अख्ख्या फिल्म युनिटच्यासमोर सणसणीत कानाखाली लगावली.
=====
हे देखील वाचा: गब्बर सिंग : बॉलिवूडचा पहिला क्रूर, निर्दयी आणि अनअपोलोजेटिक खलनायक
=====
यावेळी अमिताभ बच्चन समोरच होते. ते काहीच बोलले नाही आणि सेट सोडून घरी निघून गेले. मग काय होत्याचं नव्हतं झालं. अमिताभ-रेखाच्या ज्या प्रेमप्रकरणाबद्दल सगळे मागून बोलत होते ते सगळ्यांसमोर आले. आणि ज्या प्रोड्युसरच्या सेटवर रेखा आणि अमिताभच्या प्रेमाचा सिलसिला सुरु झाला होता. त्याच प्रोड्युसरच्या सेटवर हा सिलसिला कायमचा थांबला.