Home » टायगर 3 सिनेमातील मनाला भिडणाऱ्या ‘मेरा रुआं’ गाण्याचे व्हिडिओ व्हर्जन प्रदर्शित, काही तासातच लाखो व्ह्यूज

टायगर 3 सिनेमातील मनाला भिडणाऱ्या ‘मेरा रुआं’ गाण्याचे व्हिडिओ व्हर्जन प्रदर्शित, काही तासातच लाखो व्ह्यूज

सलमान खान, कॅटरिना कैफ आणि इम्रान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा ‘टायगर ३’ हा चित्रपट १२ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे ‘टायगर ३’ने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. जगभरात देखील या चित्रपटाचे कलेक्शन बक्कळ झाले आहे. सिनेमाची प्रदर्शनाच्या आधीपासूनच चांगलीच हवा होती. सिनेमा गाजत असताना सिनेमातील गाणी देखील खूप हिट झाली आहे. याच सिनेमातील एक रोमॅंटिक गाणे म्हणजे ‘रुआं’.

सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांनी कमालीचे उचलून धरले आहे. हे गाणे जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हापासूनच हे गाणे चार्टबस्टर्ड ठरले आहे. आता या गाण्याचा व्हिडिओ निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. याआधी या गाण्याच्या ऑडिओला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आता या गाण्याच्या व्हिडिओला देखील जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रेक्षकांच्या जोरदार मागणीचा सन्मान करत निर्मात्यांनी हा व्हिडिओ रिलीज केला आहे.

सिनेमाच्या प्रदर्शनाआधी ६ नोव्हेंबरला या गाण्याचे ऑडिओ व्हर्जन प्रदर्शित झाले होते. त्यावेळी ‘टायगर 3’च्या निर्मात्यांनी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित करण्याचे ठरवले होते. मात्र प्रेक्षकांच्या जोरदार मागणीमुळे हा व्हिडिओ लवकर प्रदर्शित झाला.

‘टायगर 3’ सिनेमातील रोमॅंटिक गाणे ‘रुआं’ हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा अरिजित सिंगने गायले आहे. मधल्या काळात सलमान आई अर्जीतमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे सलमानने त्याला त्याच्या सिनेमात गाणे गाऊ दिले नव्हते. मात्र आता बऱ्याच काळानंतर अरिजीतने साल्मनसाठी आवाज दिला आहे. या सुंदर गाण्याला प्रीतमने संगीतबद्ध केले असून, इर्शाद कामिलने गाण्याचे शब्द लिहिले आहे.

यशराजचा स्पाय थ्रिलर चित्रपटांच्या सिरीजमधला हा पाचवा सिनेमा असून, टायगर सिरीजचा तिसरा आणि शेवटचा सिनेमा आहे. यावेळेला सिनेमात झोया आणि टायगर देशाला आणि स्वतःच्या कुटुंबाला वाचवताना लढा देताना दिसणार आहे. या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत इमरान हाश्मी असून, त्याच्या अभिनयाचे खूपच कौतुक होत आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित या सिनेमाने आतापर्यंत संपूर्ण जगभरात ४०० कोटींची कमाई केली असून, हा आकडा अजून वाढणार असल्याचे जाणकार सांगत आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy