स्टार प्रवाहवरील ‘शुभविवाह’ या मालिकेत लग्नसोहळा विशेष एपिसोड सुरु आहेत. या मालिकेत आपल्याला आकाश-भूमिचा आगळावेगळा विवाह पहायला मिळत आहे. लग्नाच्या आधी हळदीचा कार्यक्रम असतो. आकाश आणि भूमिच्या हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते आहे. पण आकाश हळद लावायला नकार देतो. रागिणी त्याला थोडीशी हळद लावून घे, असे सांगत समजावते. पण आकाशवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. भूमिला हळद लागणार नाही हे पाहून पूर्णिमाला आनंद होतो.

भूमिला हळद लागत नाही ना, यातच मला समाधान आहे असे म्हणत, पूर्णिमा मनातून खूप खुश होते. पण नियतीच्या मनात वेगळेच असते. आकाश भूमिला म्हणतो की, सायकलराणी आपण येथून निघून बाहेर जावूया. असे म्हणतं तो तिचा हात पकडून तिला घेवून बाहेर पडतो. आणि पळताना हे दोघे समोरच्यांवर धडकतात. आणि त्यांच्या हातातील हळदीचे ताट हवेत उडते. आणि भूमि-आकाशच्या अंगावर पडते. अखेर भूमिला हळद लागतेच. भूमि आकाश दोघेही हळदीने माखून जातात. हे पाहून पूर्णिमाचा चेहरा पडतो.

येणाऱ्या भागात आपल्याला भूमि आकाशचा विवाहसोहळा पहायला मिळेल. लग्नानंतर भूमिची खरी परिक्षा सुरु होईल. आकाशची तब्येत सुधारेल का, ती आकाशला कसं सांभाळेल. त्यात घरात रागिणी आणि पूर्णिमा आहेतच. असे असताना भूमि या सगळ्यांपासून आपला सुखाचा संसार करु शकेल का यासाठी स्टार प्रवाहवर ‘शुभविवाह’ ही मालिका आपल्याला बुधवारी २ वा. पहावी लागेल.