Home » अमिताभ बच्चन यांच्या ‘सेक्शन 84’मध्ये दिसणार ” निम्रत कौर ” !

अमिताभ बच्चन यांच्या ‘सेक्शन 84’मध्ये दिसणार ” निम्रत कौर ” !

Nimrat Kaur

निम्रत कौर (Nimrat Kaur) तिच्या आगमी प्रोजेक्ट च्या बॅक टू बॅक घोषणां करताना दिसत आहे. तिच्या अष्टपैलु अभिनयाचं कौतुक आणि प्रेक्षकांच प्रेम तिला मिळतंय. निम्रत कौर हिने आपला पुढील चित्रपट दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सोबत करत असल्याची मोठी घोषणा केली आहे.

“मुंबई सपनों का शहर नहीं है, यह वह शहर है, जहाँ सपने साकार होते…” अशा लक्षवेधी कॅप्शनसह तिने सोशल मीडियावर वरून आपल्या आगामी चित्रपटाची मोठी बातमी दिली. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकारांच असत बच्चन सरांसोबत स्क्रीन शेयर करण्याची संधी या लहान शहरातील मुलीला मिळाल्या मुळे खूप मोठे स्वप्न साकार झालं. माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक आणि उत्कंठावर्धक कामाची अलौकिक संधी मिळाल्याबद्दल रिभू दासगुप्ता यांचे आभार. आता स्लीप लेस रात्रीची सुरुवात होऊ दे !

नक्की वाचा: Phakaat Teaser: ‘फकाट’चे हायली कॉन्फिडेन्शिअल टीझर प्रदर्शित

गेल्या वर्षी, अमिताभ बच्चन यांनी दसवीमध्ये तिच्या अप्रतिम अभिनयासाठी अभिनेत्रीचे कौतुक करण्यासाठी फुलांच्या गुच्छ आणि हस्तलिखित पत्र देखील पाठवली होती. अमिताभ बच्चनसोबत निम्रतची ही पहिलीच खास फिल्म असणार आहे.

कोर्टरूम ड्रामा थ्रिलर Te3n आणि द गर्ल ऑन द ट्रेलर फेम रिभू दासगुप्ता यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केले आहे. सेक्शन 84 हे रिलायन्स एंटरटेनमेंटने Jio स्टुडिओच्या सहकार्याने सादर केले आहे आणि रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फिल्म हँगर यांनी निर्मित केले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मिखिल मुसळे दिग्दर्शित आणि दिनेश विजन प्रस्तुत, निम्रतचा अत्यंत खास आणि सामाजिक थ्रिलर हॅपी टीचर्स डे या वर्षी रिलीज होणार आहे

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy