Home » सप्तरंगांची उधळण करणाऱ्या ‘झिम्मा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित!

सप्तरंगांची उधळण करणाऱ्या ‘झिम्मा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित!

२०२१ साली संपूर्ण महाराष्ट्राला एका वेगळ्याच भावनांची, वेगळ्याच जगाची, वेगळीच सफर घडवणाऱ्या ‘झिम्मा’ने अमाप लोकप्रियता मिळवली. या सिनेमाला मिलेल्या अभूतपूर्व यशानंतर सिनेमाच्या टिमने ‘झिम्मा २’ची घोषणा केली. त्यानंतर लोकांमध्ये या सिनेमाबद्दल कमालीची आतुरता दिसून येत आहे. अशातच आता या सिनेमाचा भन्नाट टिझर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या बहुचर्चित चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला. पुन्हा एकदा यामधील दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज झाली आहे. सात जणींच्या सात तऱ्हा या टिझर मधून अनोख्या पद्धतीने समोर येत आहेत.

टीझरमध्ये सिद्धार्थ चांदेकरचा ”यावेळेला खूपच व्हरायटी आहे.” हा संवाद या टीझरला अगदी समर्पक ठरताना दिसत आहे. कारण यावेळी या ताफ्यात आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे यावेळीही या इंद्रधनुष्याचे सात वेगवेगळे रंग बरसणार आहेत. मागच्या भागात नवीनच झालेली मैत्री हळूहळू ती बहरत गेली. आता ‘झिम्मा २’ मध्ये ही मैत्री अधिकच परिपक्व झाल्याचे बघायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनरूपी यंदाची ही सहल अधिकच अविस्मरणीय ठरणार हे नक्की.

सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या गेल्या भागातील कलाकारांसोबत आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघी देखील या तगड्या स्टारकास्टमध्ये दाखल झाल्या आहेत. हा टिझर पाहिल्यानंतर त्यांची पात्र देखील भन्नाट असल्याचे दिसून येत आहेत.

महिलांना त्यांच्या अंतरंगाचा शोध आणि ‘स्वत्त्व’ शोधायला लावणारा हा चित्रपट पुन्हा जोमाने आपल्या मैत्रिणींच्या भेटीला येत आहे. धमाल, मस्ती आणि मनोरंजनाचा फंडा नव्याने अनुभवायला आणि जगणं नव्याने एन्जॉय करायला शिकवणारा हा सिनेमा आहे.

प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच ‘झिम्मा २’ साठी हेमंतला प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले. शिवाय चांगली कथा देखील तयार झाली. प्रवासात आपण असे मित्र बनवतो जे कदाचित रोज भेटणार नाहीत, पण मागच्या खेपेला जिथं थांबलं होतं तिथनं पुन्हा सुरू होतात! याच कल्पनेवर आधारित ही ‘रियुनियन’ दुपटीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार, हे नक्की !

बऱ्याच काळानंतर एकत्र आल्यानंतर आता या सगळ्यांचे ‘रियुनियन’ किती हॅपनिंग असणार, हे अनुभवणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती, २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘झिम्मा २’ च्या प्रदर्शनाची!

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy