बॉलिवूडमध्ये अतिशय मोजक्या मात्र संस्मरणीय आणि निवडक भूमिकांमधून अभिनेत्री अदिती राव हैदरी आपल्याला दिसते. तिने स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर या ग्लॅमर जगतात एक वेगळी आणि ठोस ओळख निर्माण केली आहे. भूमिका लहान मोठी याला महत्व न देता तिने त्या भूमिकेला महत्व दिले आणि आज ती एक प्रभावी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अदितीने तिच्या करियरमध्ये अनेक उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. मात्र सध्या अदिती एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.
आपल्यात असलेल्या अभिनयाच्या प्रतिभेमुळे तिने आजपर्यंत अनेक उपलब्धी, पुरस्कार मिळवले आता यात अजून एका पुरस्काराची भर पडली आहे. अतिशय मोठा आणि मानाचा समजला जाणारा डिस्टिंक्टिव इंटरनेशनल अरब फेस्टिवल अवार्ड्स (DIAFA) 2023 तिला नुकताच प्रदान करण्यात आला. भारतीय सिनेसृष्टीतील योगदानासाठी तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही तिच्यासाठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. तिला मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या पुरस्कारामुळे तिची कीर्ती अधिकच दूरवर पसरली आहे.
DIAFA अवॉर्ड हा अदितीसाठी खरंच खूपच खास आहे. कारण हा पुरस्कार न केवल तिची प्रतिभा दाखवतो तर तिची जागतिक ओळख देखील अधिकच प्रभावी करत आहे. हे पुरस्कार विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि मानाच्या लोकांना मिळत असल्याने एक वेगळेच महत्व अदितीच्या या पुरस्काराला मिळाले आहे. जागतिक स्तरावर तिच्या कामाचे केले गेलेले हे कौतुक खरंच अभिमानाची बाब आहे. तिच्या प्रतिभेची ओळख या अवॉर्डमुळे जागतिक स्तरावर अधिक प्रभावी बनली आहे.
मिस्त्राची प्रसिद्ध अभिनेत्री फतेन हमामाला समर्पित असलेल्या, DIAFA 2023 या पुरस्कार सोहळ्यामध्ये जगातील अनेक नामचीन आणि दिग्गज लोकांना एकत्र बघण्याचे सौभाग्य मिळाले आहे. या सोहळ्यामध्ये तुर्की सुपरस्टार बुराक डेनिज़, ब्रिटिश-सीरियाई पत्रकार जिन्हें ‘द इंटरव्यूअर ऑफ द फेमस’ अदनान अलकातेब, अल्जीरियाई रॅपर आणि गायक सूलकिंग, लेबनानी सितारे कॅरोल समाहा आणि पामेला एल किक, सऊदी टीव्हीवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व एल्हम अली. मोरक्कोचे गायक साद लॅमजारेड, मिस्रची अभिनेत्री नादिया एलगेंडी आणि मोना जकी, कुवैती गायक महमोद अल्तुर्की, संयुक्त अरब अमीरातची कलाकार फातमा लूटा, पाकिस्तानी गायक-अभिनेता अली जफर आदी अनेक देशातील प्रतिभावान कलाकारांसोबत भारतीय अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीज आणि नरगिस फाखरी यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार दिला गेला.
दरम्यान अदितीच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचे झाल्यास ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’मध्ये दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. सोबतच ती नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणाऱ्या आणि विजय सेतुपति, अरविंद स्वामी यांच्या मूक सिनेमा असलेल्या ‘गांधी टॉक्स’मध्ये देखील दिसणार आहे.