Home » ‘लव्ह जिहाद’ आरोपांवर आमिर खानचं स्पष्ट उत्तर; “गौरी हिंदू नाही, कुणीही धर्मांतर केलं नाही”

‘लव्ह जिहाद’ आरोपांवर आमिर खानचं स्पष्ट उत्तर; “गौरी हिंदू नाही, कुणीही धर्मांतर केलं नाही”

तिसऱ्या लग्नानंतर सुरू झालेल्या वादावर आमिर खानचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण; गौरी स्प्रॅट ख्रिश्चन असल्याचं सांगत धर्मांतराच्या चर्चांना पूर्णविराम.

'लव्ह जिहाद' वादावर प्रतिक्रिया देताना अभिनेता आमिर खान आणि पत्नी गौरी स्प्रॅट

‘लव्ह जिहाद’च्या आरोपांनंतर अभिनेता आमिर खानने प्रथमच सार्वजनिकरित्या भूमिका स्पष्ट केली आहे. पत्नी गौरी स्प्रॅटच्या धर्माबाबत सुरू असलेल्या चर्चांवर उत्तर देताना, ती हिंदू नसून ख्रिश्चन असल्याचं त्याने सांगितलं. तसेच आपल्या कोणत्याही पत्नीने लग्नानंतर धर्मांतर केलं नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. (Aamir Khan Love Jihad)

अलीकडेच तिसऱ्यांदा विवाहबद्ध झालेल्या आमिर खानवर सोशल मीडियावर ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देत असल्याचे आरोप करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत त्याने या दाव्यांना थेट उत्तर दिलं.

आमिर म्हणाला, “आमचं कुटुंब खूप सर्वसमावेशक आहे. माझ्या दोन्ही बहिणींचे विवाह हिंदू कुटुंबात झाले आहेत. माझ्या मुलीचंही लग्न हिंदू तरुणाशी झालं आहे. माझा चुलत भाऊ मन्सूर याचं लग्न ख्रिश्चन मुलीसोबत झालं आहे.”

धर्मांतराच्या चर्चांवर भाष्य करत त्याने सांगितलं, “गौरी, किरण किंवा रीना यापैकी कुणीही धर्म बदललेला नाही. आमची लग्नं सिव्हिल मॅरेज होती. गौरी तर हिंदूही नाही, ती ख्रिश्चन आहे आणि तीही फारशी धार्मिक नाही. दिवसेंदिवस या गोष्टी अधिक विनोदी वाटू लागल्या आहेत.”

याच मुलाखतीत आमिरने मुंबईतील मरीना अपार्टमेंट्सच्या पुनर्विकासाबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही उत्तर दिलं. काही वृत्तांमध्ये त्याने जवळपास 100 कोटी रुपये खर्च करून अतिरिक्त फ्लॅट्स घेतल्याचा दावा करण्यात आला होता. पुनर्विकासानंतर स्वतः, गौरी स्प्रॅट, माजी पत्नी, मुलं आणि इतर कुटुंबीय एकाच संकुलात राहणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. (Aamir Khan Love Jihad)

मात्र, आमिरने हे दावे फेटाळले. तो म्हणाला, “मुंबईतील अनेक जुन्या इमारतींप्रमाणे आमच्या इमारतीचाही पुनर्विकास होत आहे. हा निर्णय आमच्या हाऊसिंग सोसायटीच्या सर्व सदस्यांनी एकत्रितपणे घेतला आहे. मी त्या सदस्यांपैकी एक आहे. यापेक्षा वेगळी कोणतीही विशेष बाब नाही.”

आमिर खानने 1986 मध्ये रीना दत्ता यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला जुनैद खान आणि इरा खान ही दोन मुलं आहेत. त्यानंतर 2005 मध्ये त्याने दिग्दर्शिका किरण राव यांच्याशी लग्न केलं. 2021 मध्ये दोघे वेगळे झाले असले तरी मुलगा आझादच्या संगोपनाची जबाबदारी ते संयुक्तपणे सांभाळत आहेत. यानंतर आमिरने बंगळुरूस्थित गौरी स्प्रॅटसोबत विवाह केला. गेल्या वर्षी आपल्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने गौरीची माध्यमांशी अधिकृत ओळख करून दिली होती.

=======

हे देखील वाचा: स्वरा भास्करचा CJP आंदोलनाला पाठिंबा; जंतरमंतरवर सोनम वांगचुक यांची घेतली भेट

=======

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy