अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या आगामी ‘हैवान’ या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला असून, डार्क आणि सस्पेन्सने भरलेल्या या थ्रिलरची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. दिग्दर्शक प्रियांदर्शन यांच्या या नव्या चित्रपटामुळे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. (Haiwaan First Look)
निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या फर्स्ट लूक पोस्टर्समध्ये चित्रपटाचा गडद, रहस्यमय आणि मानसिक तणावाने भरलेला माहोल स्पष्टपणे जाणवतो. त्यामुळे हा चित्रपट पारंपरिक थ्रिलरपेक्षा वेगळा अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘हैवान’मध्ये अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्यासोबत बोमन इराणी, सैयामी खेर आणि श्रिया पिळगांवकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दमदार कलाकारांची फळी आणि प्रियांदर्शन यांचे दिग्दर्शन यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
या चित्रपटाची निर्मिती वेंकट के. नारायण आणि शैलजा देसाई फेन यांनी KVN Productions आणि Thespian Films यांच्या बॅनरखाली केली आहे.
‘हैवान’ हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. फर्स्ट लूकनंतर आता या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरची प्रेक्षकांना प्रतीक्षा लागली आहे. (Haiwaan First Look)
=======
हे देखील वाचा : Musafir Cafe Trailer: विक्रांत मेस्सीच्या रोमँटिक ड्रामाचा ट्रेलर प्रदर्शित, 24 जुलैला Netflix वर रिलीज
=======