Home » परब कुटुंबाचा विश्वविक्रम! ७००० भक्तांसोबत श्री स्वामी समर्थ तारक मंत्र पठण, ‘सनई चौघडे’ टीमचा अनोखा उपक्रम

परब कुटुंबाचा विश्वविक्रम! ७००० भक्तांसोबत श्री स्वामी समर्थ तारक मंत्र पठण, ‘सनई चौघडे’ टीमचा अनोखा उपक्रम

परब कुटुंबानी ७००० स्वामी भक्तांसोबत श्री स्वामी समर्थ तारक मंत्र पठण करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ घातली गवसणी !

विश्वशांतीसाठी विश्वविक्रमी श्री तारक मंत्र पठण – ‘सनई चौघडे’ मालिकेतील कलाकारांचा अनोखा उपक्रम !

प्रेक्षकांना नेहमीच दर्जेदार आणि मनोरंजक कार्यक्रम देणाऱ्या झी मराठीवर ‘सनई चौघडे’ ही नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, अवघ्या काही दिवसांतच तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. लालबागमध्ये राहणाऱ्या परब कुटुंबाची आणि त्यांच्या स्वामींवरील अढळ श्रद्धेची ही कथा आहे. याच भक्तीभावातून प्रेरणा घेत परब कुटुंब मुंबईहून थेट त्र्यंबकेश्वर येथील ‘श्री स्वामी समर्थ गुरुपीठात’ दाखल झाले, एका विशेष आणि विश्वविक्रमी उपक्रमासाठी.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपाआशीर्वादाने जवळपास ७००० हून अधिक भक्तांसोबत परब कुटुंबाने श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे सामूहिक पठण केले आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ मध्ये आपली नोंद केली. या दिव्य क्षणाने सर्व कलाकारांसाठी अभिमानाचा आणि भावनिक अनुभव दिला.

या भव्य सोहळ्यात परब कुटुंबातील पमा, सुभाष आणि त्यांच्या चारही मुलींच्या भूमिकेत असलेले कलाकार – मेघना एरंडे जोशी, सुहास शिरसाट, चिन्मयी साळवी, श्वेता गायकवाड, जुई गोगरी आणि रुची नेरुरकर यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

मेघना एरंडे जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “आजचा अनुभव माझ्यासाठी केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर एक अत्यंत आध्यात्मिक आणि अंतर्मुख करणारा प्रवास होता. ७ हजारहून अधिक भक्त एकाच सुरात स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करताना पाहणं आणि त्याचा भाग होणं, हे शब्दांत सांगणं खरंच कठीण आहे. त्या क्षणी एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान जाणवलं. अशा पवित्र वातावरणाचा भाग होण्याची संधी ‘सनई चौघडे’ आणि झी मराठीमुळे मिळाली, यासाठी मी मनापासून आभारी आहे.”

तेव्हा पाहायला विसरू नका ‘सनई चौघडे’, दररोज रात्री ८.३० वाजता, फक्त आपल्या झी मराठीवर.

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy