‘फराज’ (Faraaz) हा एक उत्कंठावर्धक आणि तितकाच कमालीचा होस्टेज ड्रामा आहे. ढाका इथे घडलेला हा एक अनोखा पण तितकाच लक्ष वेधून घेणारा चित्रपट आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट कमालीचा आहे. मेहता हे त्यांच्या उत्तम चित्रपट दिग्दर्शना साठी ओळखले जातात.
या तीन कारणासाठी तुम्ही वीकेंड ला फराज पाहिला पाहिजे ….
1 ) भावनिक आणि सक्षम कहाणी असलेला चित्रपट …
फराज ही एक शौर्याची गोष्ट आहे. ढाका इथल्या कॅफे मध्ये शूट झालेली एक गोष्ट आहे. कॅफे मध्ये दहशतवादी हल्ला आणि इथल्या कॅफे मधली थरारक गोष्ट फारज मध्ये पाहायला मिळते. थक्क करणारा प्रवास यातून बघायला मिळतो.
2 ) नव्या टॅलेंट च्या सोबतीने बनलेला हा खास चित्रपट असून झहान कपूर , आदित्य रावल , जुही बाबर या नवा कलाकारांनी उत्तम अभिनय केले आहेत.
3 ) एखाद्या चित्रपटाची शक्ती काय असते हे या चित्रपटातून समजत. मनोरंजन , प्रेरणा आणि प्रबोधन यांनी संपूर्ण असलेला हा चित्रपट आहे. थरारक गोष्टीतून आजच्या समाजातील मुख्य गोष्टी यातून समजतात. मनोरंजनाच्या पलिकडे जाऊन चित्रपटाची ताकद काय असते हे फराज बघून लक्षात येत.
नक्की वाचा: अमिताभ बच्चन यांच्या ‘सेक्शन 84’मध्ये दिसणार ” निम्रत कौर ” !
कमालीच्या कलाकारांना घेऊन केलेला आणि दिग्दर्शकाने उत्तम शूट केलेला हा चित्रपट बघणं चुकवू नका. भावनिक तितकाच ताकदीचा हा चित्रपट सगळ्यांनी पाहिला पाहिजे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला फराज सोशल मीडिया वर चांगलाच लोकप्रिय ठरतो आहे. नेटफ्लिक्सवर टॉप 10 चित्रपटा मध्ये हा चित्रपट आला आहे.
हंसल मेहता यांच दिग्दर्शन, भूषण कुमार निर्मित अनुभव सिन्हा, साक्षी भट, साहिल सैगल मझाहिर मंदसौरवाल यांनी हा चित्रपट केला आहे. हा चित्रपट टी सिरीज यांच्या सोबतीने सह निर्मित आहे महाना फिल्म्स बनारस फिल्म यांच्या सोबतीने सह निर्मित आहे. झहान कपूर, आदित्य रावल, जुही बाबर, अमीर अली, सचिन ललवानी, पल्लक ललवाणी, रेशमा सहनी ही उत्तम कलाकार यात आहे.