उत्तम आरोग्याला चालना देण्यासाठी आणि लोकांमध्ये उत्तम आरोग्याच्या महत्त्वाबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन याजरा कला जातो. एण्ड टीव्हीवरील कलाकार मोहित डागा (अशोक, ‘दूसरी माँ’), कामना पाठक (राजेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि आसिफ शेख (विभुती नारायण मिश्रा, ‘भाबीजी घर पर है’) आरोग्यदायी शरीर व मन राखण्याबाबत सल्ला देण्यासोबत त्यांच्या दैनंदिन फिटनेस नित्यक्रमांबाबत सांगत आहेत. (TV actors on World Health Day)
अशोकची भूमिका साकारणारे मोहित डागा म्हणाले, ‘‘माझा ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ यावर पूर्णत: विश्वास आहे. माझा सोपा फिटनेस मंत्र म्हणजे आरोग्यदायी आहाराचे सेवन, पुरेशी झोप आणि दररोज व्यायाम करणे. हे तीन घटक मला आरोग्यदायी जीवनशैली राखण्यास, आजारापासून दूर राहण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. मी कमी तेल व उच्च पौष्टिक असलेला आरोग्यदायी आहार सेवन करण्याची काळजी घेतो. मी आठ तास पुरेशी झोप घेतो आणि सकाळी लवकर उठून नियमितपणे व्यायाम करतो. मी चिंतन देखील करतो आणि प्रेरणादायी कन्टेन्ट पाहतो. मानसिक व शारीरिक आरोग्यामध्ये संतुलन असेल तरच त्याला फिटनेस म्हणतात. यंदा जागतिक आरोग्य दिनानिमित्त मी सर्वांना आरोग्यदायी आहार सेवन करण्याचे, नियमित तपासणी करण्याचे आणि हृदयाचे आरोग्य आनंदी व आरोग्यदायी ठेवण्याचे आवाहन करतो.’’
राजेशची भूमिका साकारणाऱ्या कामना पाठक म्हणाल्या, ‘‘मी दिवसभरात भरपूर पाणी पिण्याची खात्री घेते. तसेच, मी ताज्या फळांचा किंवा भाज्यांचा रस असलेली बाठटल सोबत ठेवते. याव्यतिरिक्त मी स्वत:ला आरामदायी ठेवण्यासाठी ब्रेक्सदरम्यान मेडिटेशन करते. आरोग्यदायी शरीरासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वेळी आरोग्यदायी आहार सेवन करणे. माझी खाण्याची कितीही इच्छा झाली तरी मी जंक फूड खाणे टाळते आणि माझ्या दैनंदिन आहारामध्ये पालेभाज्या, ताज्या भाज्या, फळे व दूध यांचा समावेश करते. म्हणून मी सर्वांना आरोग्यदायी राहण्यासाठी आरोग्यदायी आहार सेवन करण्याची शिफारस करते, तसेच आरोग्यदायी जीवनशैलीसाठी भरपूर पाणी पिण्याची खात्री घ्या.
नक्की वाचा: दिग्दर्शक हंसल मेहता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली “फराज” हा चित्रपट तुम्ही का पहावा याची खास कारण….
’’विभुती नारायण मिश्राची भूमिका साकारणारे आसिफ शेख म्हणाले, ‘‘तणाव-मुक्त राहणे हा माझा सर्वात महत्त्वाचा फिटनेस मंत्र आहे. आज बहुतेक लोकांना तणावामुळे आरोग्यविषयक समस्या जाणवत आहेत. मी दीर्घकाळापासून काम करत आहे आणि माझ्या वर्कआऊट नित्यक्रमाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. माझ्या घरापासून मालिकेच्या सेटवर जाण्याकरिता किमान दीडतास लागतो. यादरम्यान मी कारमध्ये मेडिटेशन, वाचन व योगा करतो. मी स्पर्धात्मक क्रिकेटर होतो आणि खेळाने मला आरोगयदायी व तंदुरूस्त राहण्यास मदत केली आहे. मला अधिकाधिक तरूणांना आरोग्यदायी व उत्तम शरीरयष्टी प्राप्त करण्यासाठी मैदानी खेळ खेळताना पाहायला आवडेल. तसेच माझा आहारावर अधिक प्रमाणात खर्च करण्यावर किंवा अधिक प्रमाणात आहार सेवन करण्यावर विश्वास नाही. आरोग्यदायी राहण्यासाठी फक्त घरी बनवलेला आरोग्यदायी आहार सेवन करण्याची, योगा करण्याची, खेळामध्ये सहभाग घेण्याची आणि पुरेशा आरामाची गरज आहे. माझ्याकडून सर्वांना आनंदी व आरोग्यदायी वर्षाच्या शुभेच्छा.’’
पहा ‘दूसरी माँ’ रात्री ८ वाजता, ‘हप्पू की उलटन पलटन’ रात्री १० वाजता आणि ‘भाबीजी घर पर है’ रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्त एण्ड टीव्हीवर!