मालिका, चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब असतात. पण अनेकदा सामाजिक विषयांवर प्रकाश टाकण्याचे कामही ही माध्यम अगदी चोख बजावतात. असाच एक सामाजिक विषय हाताळत समाजाच्या मानसिकतेवर ताशेरे ओढणारी मालिका म्हणजे सन मराठी (Sun Marathi) वरील मालिका ‘सुंदरी’. आजही स्त्रिया अनेक अधिकारांपासून वंचित आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा हक्क. स्त्रियांना अंत्यसंस्काराचा हक्क नाही, इतकंच नव्हे तर त्यांना अंत्यसंस्कार विधीला येण्याचीही मुभा नसते. ‘अंत्यसंस्काराचा हक्क स्त्री-पुरुष दोघांना हवा’ या नाजूक विषयावर ‘सन मराठी’ वरील ‘सुंदरी’ (Sundari) मालिकेतून प्रकाश टाकण्यात आला आहे.
नक्की वाचा: ‘अप्पी आमची कलेक्टर’ झाली, छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘त्या’ उत्तराने जिंकली मनं
‘सुंदरी’ ही मालिका मूळातच समाजातल्या स्त्रीच्या सौंदर्याच्या रुढ कल्पनांवर ताशेरे ओढते. या मालिकेतील नायिका रंग रुप नसलेली असल्याने तिचा पती, पत्नी म्हणून तिचा स्वीकार करण्यास नकार देतो. पण मूळातच हुशार, कर्तबगार असलेली सुंदरी तिच्या दिसण्यावर मात करत स्वत:ची ओळख बनवते. येणाऱ्या भागात सुंदरी तिच्या वडिलसमान सासऱ्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे धाडसी पाऊल उचलताना दिसणार आहे. गावागावात आजही जिथे मुलीला आपल्या आई वडिलांच्या अंत्यसंस्काराचा हक्क नाही तिथे एखाद्या सूनेला हा हक्क मिळणे तर अशक्यच. परंतु, समाजाने आखून दिलेली ही सीमारेषा मात्र सुंदरी ओलांडणार आहे.
तर मग ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता नक्की पहा.