कलाकार म्हटले की, आपल्याला आठवते ती त्यांची आलिशान जीवनशैली. भरपूर पैसा, नाव, प्रसिद्धी कसली म्हणजे कसली कमी नाही. कलाकार सतत विविध ठिकाणी जाता येताना मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये स्पॉट होतात. ते काय घालतात काय करतात अशा बारीक बारीक गोष्टींची देखील मीडियामध्ये, सोशल मीडियावर कमालीची चर्चा होते. एखाद्या वेळेस जर कलाकारांकडून त्यांचा एखादा ड्रेस पुन्हा घातला गेला तर ती देखील एक मोठी बातमी होते आणि त्यावर भरपूर चर्चा होते. ड्रेस रिपीट झाल्यानंतर त्या कलाकाराला सोशल मीडियावर ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते.
तसे पाहिले तर कलाकार आणि त्याचे रिपीट ड्रेस हा वाटत नसला तरी अनेकांच्या दृष्टीने मोठा आणि चर्चेचा मुद्दा आहे. बरेच कलाकार अनेकदा त्यांचे ड्रेस रिपीट करत घालताना दिसतात. कलाकार आणि त्याचे रिपीट ड्रेस यावर आता बॉलिवूडची फॅशननेस्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनम कपूरने भाष्य केले आहे. सोनम कपूरने ड्रेस रिपीट करण्यावर तिला काहीही हरकत नसल्याचे सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वीच आलिया भट्टने राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना तिच्या लग्नाची साडी नेसली होती. दीपिका देखील अनेकदा तिचे कपडे रिपीट करताना दिसत असते. यावर शाहरुख खानची मुलगी असलेल्या सुहाना खानने देखील तिचे मत व्यक्त केले होते. आता यावर सोनम कपूरने तिचे मत मांडले आहे. फॅशन आयकॉन म्हणून सोनम कपूरला ओळखले जाते. तिला भारताची फॅशन अँबेसिडर
भारतचा फॅशन चेहरा असलेल्या सोनम कपूरने सांगितले की, लोकांना असे कपडे खरेदी केले पाहिजे जे अनेक वर्षांपर्यंत तुम्ही वापरू शकता. सोबतच तिने हे देखील सांगितले की, लोकांनी विंटेज विचार आणि गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. गोष्टींचा पुनर्वापर करणे, कपडे पुन्हा घालणे याची गरज ओळखून जागरूक झाले पाहिजे.
पुढे सोनमने सांगितले, “माझ्यासाठी दीर्घकाळासाठी वापरले जाणारे उत्पादन वापरणे लक्जरी आहे. काही वर्षांपूर्वी माझी आई, आजी महागड्या साड्यांना मुलायम कपड्यात ठेवायच्या. टेलर आपले माप घेऊन कपडे शिवायचे, चांभार आपल्या मापाने चप्पल शिवून द्यायचा, मी अजूनही तेच करते. मी पर्सनलाइजेशन आणि हस्तनिर्मित वस्तूंची स्तुती करतच मोठी झाली. मी नेहमीच अशा वस्तू घेताना प्राधान्य देते, ज्या स्थानिक लोकांनी हातांनी बनवल्या आहेत. मी अनेकदा माझे कपडे पुन्हा घालते.”
दरम्यान सोनम कपूर तिच्या अभिनयापेक्षा चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या फॅशनमुळेच चर्चेत असते. तिच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती सध्या दोन नवीन प्रोजेकॅक्ट्समध्ये दिसणार आहे. यातला एक प्रोजेक्ट म्हणजे ‘बॅटल फॉर बिटोरा’ आणि एक प्रोजेक्ट अजूनही गुलदस्त्यात आहे.