प्राजक्ताने परिधान केलेला हा दागिणा आहे ‘तन्मणी’! भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक पेशवेकालीन प्रसिद्ध दागिना, मोत्यांच्या अनेक सरांनी अडकवलेला एक मोठा खडा किंवा अनेक खडयांचे आणि कच्च्या (पैलू न पाडलेल्या) हिऱ्यांचे खोड ही या अलंकाराची खासियत आहे. सौ. प्राजक्तराजहा आहे प्राजक्ताचा आवडता दागिण “पुतळी हार”. हा दागिणा आपल्याला कोल्हापूरच्या “महालक्ष्मी” च्या गळ्यात पहायला मिळतो. ज्यात पुतळ्यांवर लक्ष्मी असते. अतिशय जूना, हलका आणि adjustable असल्याने प्राजक्ताला हा अलंकार आवडतो. सौ. प्राजक्तराजमहाराष्ट्राच्या इतिहासातला एक अतिशय रेखीव असा अलंकार म्हणजेच ‘कोल्हापूरी साज’. या अलंकारांचं वैशिष्ट्य असं की या मधे दशावतारांचे चित्रण होते, साज २१ पानड्यांनी संपूर्णतः हस्तकौशल्य वापरून बनवला जातो,या सौभाग्यलंकाराला पश्चिम महाराष्ट्रात मंगळसूत्राचे स्थान आहे. सौ. प्राजक्तराज ‘बंद घसाची वज्रटीक’…महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेतील आणखी एक ठसठशीत दागिना. सौ. प्राजक्तराजहे सर्व दागिणे प्राजक्तराजच्या वेबसाईटवर https://www.prajaktaraj.in/ पाहता येतील. सौ. प्राजक्तराज