Home » तीन मुलं असलेल्या विवाहीत निर्मात्यासोबत लग्न, मग आयुष्यभराचे एकटेपण…जया प्रदाची दुख:द प्रेमकहाणी

तीन मुलं असलेल्या विवाहीत निर्मात्यासोबत लग्न, मग आयुष्यभराचे एकटेपण…जया प्रदाची दुख:द प्रेमकहाणी

हिंदी सिनेमापासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, आपल्या अभिनयाच्या जोरावर एकापेक्षा हिट चित्रपट देवून प्रेक्षकांच्या हद्यावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री जयाप्रदा यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. जया प्रदा यांचे लहानपणीचे नाव ललिता राणी. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशच्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटूंबात झाला. लहानपणी डॉक्टर व्हायचे स्वप्न बाळगणा-या जयाप्रदाने १४ वर्षापासून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. (Jaya Prada)

जया प्रदा शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये नृत्य सादर करताना एका निर्मात्याची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी जया प्रदा यांना त्यांच्या ‘भूमि कोसम’ या सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. या चित्रपटात त्या एका गाण्यामध्ये झळकल्या होत्या. तीन मिनिटांच्या या गाण्यासाठी त्यांना १० रुपये फी देण्यात आली होती. यावेळी अभिनेते प्रभाकर रेड्डी यांनी त्यांना ‘जया प्रदा’ हे नाव दिले. त्यानंतर जया प्रदा यांनी ८ भाषांमध्ये तब्बल ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. जया प्रदा या त्यांच्या सिनेमांमध्ये जितक्या लोकप्रिय ठरल्या, तितकेच त्यांचे व्ययक्तिक आयुष्यही कायम चर्चेचा विषय ठरले.

Google Image

पडद्यावर जया प्रदा आणि जितेंद्र ही जोडी हिट होती. एका रिपोर्टनुसार २५ सिनेमांमध्ये या जोडीला एकत्र कास्ट करण्यात आले होते. यापैकी १९ सिनेमे हे हीट ठरले. अमिताभ बच्चनसोबतही त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडायची. पडद्यावर कायम संस्कारी आणि आदर्श पत्नीच्या भूमिकेत प्रेक्षकांना आपलं करणाऱ्या जया प्रदा ख-या आयुष्यात एका विवाहीत निर्मात्याच्या प्रेमात पडल्या आणि लोकांनी त्यांना दुसरी बायको म्हणून हिणवले. (Jaya Prada Birthday)

जया प्रदा ८०च्या दशकातल्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यावेळी त्या आयकर विभागाच्या रडारवर आल्या. छापेमारी दरम्यान जया प्रदा आयकर विभागाच्या सापळ्यात अडकल्या. त्यावेळी निर्माते श्रीकांत नहाटा त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. इथूनच पुढे याच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली. पण जया प्रदा यांच्या करिअरला मात्र उतरती कळा लागली. याचदरम्यान जया प्रदा यांनी निर्माते श्रीकांत नहाटा यांच्यासोबत गुपचूप लग्नसोहळा उरकला. लग्नावेळी श्रीकांत नहाटा हे पहिल्या पत्नीपासून वेगळे झालेले नव्हते.

=====

हे देखील वाचा: …आणि जया बच्चनने अमिताभसमोर रेखाच्या कानाखाली लगावली

=====

आणि त्यांना मुलेही होती. श्रीकांत नहाटा यांनी जयाप्रदा यांच्यासोबत लग्न केले तरी आपल्या पहिल्या पत्नीस कधीच सोडले नाही. एवढेच नाही तर त्यांना जया प्रदा यांच्यासोबतच्या लग्नानंतरही एक मुल झाले. आणि जया प्रदा यांना श्रीकांत यांनी मुल होवू दिले नाही. यामुळेच या दोघांच्या नात्यात कटुता येण्यास सुरुवात झाली. आणि काही काळानंतर हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर जयाप्रदा यांनी आपल्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतले. आज त्या आपल्या दत्तक घेतलेल्या मुलासोबत राहतात.

Google Image

जया प्रदा यांनी राजकारणातही स्वतला आजमावले. त्यांनी १९९०ला ‘तेलगू देसम पार्टी’त प्रवेश केला. मग २०००ला ‘समाजवादी पक्षा’त प्रवेश केला. यावेळी अमर सिंह आणि जया प्रदा यांच्या मैत्री खूपच चर्चेत होती. त्यानंतर त्यांनी ‘लोकदल पार्टी’मध्ये प्रवेश केला होता. काही काळाने त्या समाजवादी पार्टीत परतल्या.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy