सध्या आपण सर्व मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने दिवाळीचा सण साजरा करत आहोत. या दिवाळीच्या निमित्ताने मनोरंजनविश्वातही मोठा जल्लोष दिसून येत आहे. मराठी मालिकांमध्ये देखील दिवाळीचा ट्रॅक दाखवला जात आहे. अशातच आता मराठी मालिका विश्वातील अतिशय लोकप्रिय आणि टॉपची मालिका असलेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतही आता दिवाळी सणाची लगबग दिसून येत आहे. अक्षरा आणि अधिपती यांची लग्नानंतरची पहिली दिवाळी असल्याने मालिकेत सध्या सर्वच खूप आनंदी आहे. अशातच आता अक्षरा आणि अधिपती यांच्या मैत्रीला देखील हळूहळू सुरुवात होत आहे. त्यामुळे दोघांची पहिलीच एकत्र असलेली ही दिवाळी बघण्यासाठी प्रेक्षक देखील खूपच उत्साही आहे.
मालिकेत आता अक्षरा दिवाळीसाठी स्वतःच्या हाताने एक सुंदर आकाशकंदील बनवते. तिने बनवलेला आकाशकंदील पाहून अधिपती पुन्हा तिच्या प्रेमात पडतो. अक्षराचा अतिशय सुंदर आकर्षक आकाशकंदील पाहून अधिपती खूप खुश होतो. मात्र इथेच एक ट्विस्ट आहे. अधिपती अक्षराने बनवलेला आकाशकंदील घरासमोर मोठ्या कौतुकाने लावतो.
मात्र तो आकाशकंदील पाहून भुवनेश्वरी चिडते आणि तिने जो आकाशकंदील आणला तो लावण्याचे अधिपतीला सांगते. भुवनेश्वरी म्हणते की, तिने आणलेला आकाशकंदील हा सूर्यवंशींच्या घराण्याला साजेसा आहे. त्यामुळे तिचाच आकाशकंदील घरासमोर लावायचा. अक्षराचा आकाशकंदील छान असला तरी तो सूर्यवंशींच्या घराची शान वाढवणारा नसल्याचे देखील ती सांगते. त्यामुळे घरासमोर तिचाच आकाशकंदील लागला पाहिजे.
आता आईचा हट्ट पुरवायचा की, बायकोचे मन सांभाळायचे असा पेच अधिपतीसमोर राखला आहे. दोघीना देखील त्याला दुखवायचे नाही, मग यातून मार्ग कसा काढायचा आणि कोणालाही न दुखवता नक्की कोणाचा आकाशकंदील घरासमोर लावायचा यामुळे तो चिंतेत आहे. आता यातून अधिपती कसा मार्ग काढेल आणि नक्की कोणाचाच आकाशकंदील घराची शोभा वाढवेल हे पहाणे नक्कीच आतुरता वाढवणारे असणार आहे.
यासोबतच अक्षरा आणि अधिपती यांचा लग्नानंतरचा पहिला पाडवा असल्याने अधिपती अक्षराला काय भेट देतो हे देखील पाहायला मज्जा येणार आहे. अधिपतीने मास्तरीणबाईंना खास भेट देण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावर उरणार नाही. मात्र ती भेट भुवनेश्वरला आवडेल का?, भुवनेश्वरला त्या भेटीबद्दल माहित असेल का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी पाहायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ दिवाळी विशेष भाग सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. आपल्या झी मराठी वाहिनीवर.