नाते जितके जुने होत जाते तितकेच ते अधिक परिपक्व बनते अगदी मुरांब्यासारखे. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘मुरांबा’ (Muramba) ही मालिका अक्षय आणि रमाच्या अशाच नात्यावर आधारित आहे. हे नाते आता अजूनच घट्ट होत चालले आहे. मुरांबा मालिकेत सध्या नैना नावाचे वादळ मुकादमाच्या घरात घोंघावताना दिसत आहे.

नैनाचे सत्य रमाला माहिती आहे. आणि म्हणूनच ती सासरे शशिकांत यांना ते चुकीचे वागत असल्याचे ती स्पष्टपणे ठणकावून सांगते. अर्थातच शशिकांतचा इगो दुखावतो. हे नाते रमा अक्षयपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तो हे दुख पचवू शकणार नाही हे रमाला माहिती आहे. पण अक्षयलाही रमाच्या हातात नैनाचा फाडलेला फोटो मिळाला आहे. या फोटोत नैनासोबत कोणता पुरुष आहे. नैनाचा फोटो रमाकडे कसा, रमा नैनाबद्दल काही लपवत आहे का असे अनेक प्रश्न अक्षयच्या मनात आहेत.
नक्की वाचा: पंचवीस तासांचे शूटिंग आणि अश्रू अनावर, ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेतील अभिनेत्याची भावूक पोस्ट

अक्षय़ रमाजवळ मनं हलकं करताना म्हणतो की,मला जे कळालय ते खूप भायनक आहे. डॉक्टरांनी मला जे सांगितले त्यावर माझा विश्वास बसत नसल्याचे सांगतो. त्यावर रमाला धक्का बसतो आणि तिला नैना आणि डॉक्टरांचा काय संबंध कळत नाही जो ती बोलून दाखवते. यावर अक्षय़ तिला मी आरती वहिनीबद्दल बोलत असल्याचे सांगतो. त्यामुळे पुन्हा एकदा अक्षयच्या मनात रमा नैनाबद्दल काहितरी लपवत असल्याची शंका येते. असे असतानाच अक्षयला नैना शशिकांतला भेटताना दिसते. मुकादमांच्या घरात आधीच आरती वहिनींचा खोटेपण समोर आल्याचा धक्का अक्षयला बसला आहे त्यात आता नैना आणि शशिकांतचे अफेअर समोर आले तर काय होईल? रमाला हे सत्य आधीच माहिती होते, तिने हे सत्य लपवून ठेवले याचा त्यांच्या नात्यावर काही परिणाम होईल का ? हे सत्य आता लवकरच अक्षयसमोर येणार आहे. तेव्हा तो काय पावलं उचलेल? तो हा धक्का पचवू शकेल का ? रमा अक्षय आणि घराला सांभाळू शकेल का? यासाठी आपल्या मुरांबा ही मालिका स्टार प्रवाहवर नक्की पहा.