बॉलीवूडच्या हिट कॉमेडी फ्रँचायझीमध्ये वेलकम या चित्रपटाचे नाव पहिल्या स्थानावर असणार आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित ‘वेलकम’ २००७ मध्ये प्रदर्शित झाला आणि घुंगरु शेठच्या कॉमेडीने बॉक्स ऑफीसला डोक्यावर घेतले. या पहिल्या ‘वेलकम’मध्ये अनिल कपूर, नाना पाटेकर आणि अक्षय कुमार या त्रिकुटाने लोकांना खूप हसवले. या चित्रपटाच्या यशानंतर ‘वेलकम २’ २०१५ मध्ये आला. यात जॉन अब्राहमसह नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी प्रेक्षकांना हसवले. आता याच वेलकम सिरिज मधील ‘वेलकम टू द जंगल’ हा तिसरा चित्रपट ख्रिसमसला बॉक्स ऑफीसवर येत आहे. ‘बागी २’ आणि ‘बागी ३’ सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे अहमद खान हा वेलकम टू द जंगल बनवत आहेत. या चित्रपटाचे लेखक फरहाद साजमी आहेत. या मल्टीस्टारर चित्रपटात कॉमेडीचा ओव्हरडोस पहायला मिळणार आहे. (Welcome to the Jungle)
वेलकम चित्रपटाच्या सिरीजमधील तिसरा चित्रपट वेगळ्या रंगरुपात येत आहे. वेलकम चित्रपटातील दोन मुख्य कलाकार नाना पाटेकर आणि अनिल कपूर या तिस-या चित्रपटात नाहीत. या दोन बड्या कलाकारांना वगळून बाकीचं सर्व बॉलिवूड त्यात सामावलं आहे. वेलकम टू द जंगल हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होईल. अक्षय कुमार, संजय दत्त यांच्यासह सर्व कलाकारांचा जणू गोतावळाच या चित्रपटात जमा झाला आहे. त्यामुळेच वेलकम टू द जंगलचे बजेट मोठे आहे. शिवाय याच्या शुटिंगसाठीही दिग्दर्शकांना मोठा टास्क करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपट मल्टीस्टार टास्कमुळे अडकल्याची चर्चा होती. तसेच मोठ्या बजेटचाही चित्रपटाच्या शुटींगला फटका बसला होता. वेलमक चित्रपटातील अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांची जागा संजय दत्त आणि अर्शद वारसी यांनी घेतली आहे. (Welcome 3)
‘वेलकम’ चित्रपटात मध्ये नाना पाटेकर यांनी साकारलेली उदय शेट्टी आणि अनिल कपूरने साकारलेली मजनू भाई या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिस-या भागात हे दोघेही गायब होऊन त्यांच्या जागी अक्षय कुमारसोबत संजय दत्त उदयभाईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अर्शद वारसी मजनू भाईच्या भूमिकेत दिसणार आहे. वेलकम चित्रपटाचे पहिले दोन भाग अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केले होते. यावेळी अहमद खान यांच्या दिग्दर्शनाखाली तिसरा चित्रपट तयार होतोय. बॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून करिअर सुरु केलेले अहमद खान प्रसिद्ध कोरिओग्राफरही आहेत. त्यांच्या आयुष्यातीलही दिग्दर्शन हा तिसरा टास्क आहे. वेलकम टू द जंगलचे निर्माते फिरोज ए नाडियादवाला असून चित्रपटाची बहुतांश शुटींग पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या मल्टीस्टारर चित्रपटात अक्षय कुमारसह संजय दत्त, अहमद खान, अर्शद वारसी, अक्षय कुमार, फिरोज नाडियादवाला, परेश रावल, सुनील शेट्टी, रवीना टंडन, तुषार कपूर, राजपाल नौरंग यादव, लारा दत्ता, दलेर मेहंदी, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक, मिका सिंग, जॅकलिन, राजपाल यादव, जॉनी लीव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, यशपाल शर्मा, राहुल देव असे तब्बल वीस कलाकार झळकणार आहेत. वेलकम टू द जंगल शुटींग डिसेंबर २२ मध्येच सुरु झाले होते. मात्र काही काळ अडकलेल्या या चित्रपटाचे काही मोजकेच शुटीग बाकी राहीले असून ते मुंबईत पूर्ण होत आहे. कॉमेडी आणि ड्रामाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटात अनेक कलाकार नव्यानं प्रवेश करणार आहेत.
मराठमोळा श्रेयस तळपदे त्यात एक आहे. श्रेयसने ‘गोलमाल’ चित्रपटात आपले विनोदी कौशल्य दाखवले आहे. त्याच्यासोबत तुषार कपूरही अनेक महिने मोठ्या पडद्यावरील संधीच्या प्रतीक्षेत होता. त्यासाठीही वेलकम टू द जंगल महत्त्वाचा ठरणार आहे. कॉमेडी ड्रामा असलेल्या या चित्रपटात पोलीस अधिकारी जय बक्षी आणि संध्या यांना कुख्यात गुन्हेगार राज सोलंकीचा माग काढण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र तेव्हाच जयला कळते की राजची त्याच्या आयुष्यातील भूमिका महत्त्वाची आहे. त्याचवेळी चित्रपट वेगळ्या वळणावर जातो. तो कुठल्या वळणावर जातो, हे बघण्यासाठी २० डिसेंबर २०२४ ची प्रतीक्षा करावी लागणार आहे.